मुंबई, 24 जून : प्रोफेशनल लाइफमध्ये सगळ्यांनीच अपडेट राहणं आवश्यक आहे. वेळेनुसार तुम्ही स्किल आणि ज्ञानात वाढ केली नाहीत, तर तुम्ही मागे पडता. नुकत्याच केलेल्या एका रिसर्चमध्ये हे सिद्ध झालंय की जगातल्या प्रत्येक सहाव्या स्त्रीची नोकरी धोक्यात आहे. कन्सल्टन्सी फर्म मॅकिन्जीच्या नव्या रिसर्चप्रमाणे भविष्यकाळात महिलांसाठी नोकरीत 20 टक्के जास्त संधी उपलब्ध आहे. पण येणाऱ्या काळाची पावलं ओळखून स्किलमध्ये सुधारणा केली नाही तर नोकरीच्या ठिकाणी स्त्री-पुरुष असमानता नक्कीच वाढेल. पैसे कमवले आणि खर्च केले, पण या 5 गोष्टी केल्यात का? भारतात 1.1 कोटी महिलांची नोकरी धोक्यात योरस्टोरीमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार भारतात जवळजवळ 1.1 कोटी महिलांची नोकरी जाऊ शकते. नोकरीतली अनेक तंत्र बदलतायत. महिलांना यात स्वत:ला सामावून घ्यावं लागेल. ते त्यांच्यासाठी मोठं आव्हान आहे. आधीच स्त्रिया आपापल्या कार्यक्षेत्रातल्या अनेक अडथळ्यांशी सामना देतायत. मोदी सरकारच्या मदतीनं ‘अशी’ करा दर महिन्याला 30 हजार रुपये कमाई बदलावी लागतील आपली क्षेत्र ‘द फ्युचर आॅफ वुमन अॅट वर्क : ट्रान्सिशन इन द एज ऑफ ऑटोमेशन’ अशा शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यात सांगितलंय की, पुढच्या एक दशकात जगातल्या 10 कोटींपेक्षा जास्त स्त्रियांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. किंवा त्यांना आपलं क्षेत्र बदलावं लागेलं. या रिसर्चमध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, युके, चीन, भारत, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका या दहा मोठ्या अर्थव्यवस्थांवर फोकस केला गेला. आॅटोमेशनमुळे जवळजवळ 10.7 कोटी स्त्रियांची नोकरी जाऊ शकते. काँग्रेस अध्यक्षपदासाठी ही पाच नावं चर्चेत दरम्यान, अमेरिका आणि चीनमधलं ट्रेड वाॅर तर वाढतंच आहे. वाॅल स्ट्रीटवरच्या सर्वात मोठ्या बँकांनी गुंतवणूकदारांना वाढत्या मंदीबद्दल सावध केलंय. इन्व्हेस्टमेंट बँक आणि फायनॅन्शियल सर्विसेज कंपनी माॅर्गन स्टेनली ( Morgan Stanley )नं एक पत्रक प्रसिद्ध केलं. त्यात असं म्हटलंय की अमेरिका आणि चीनमधलं ट्रेड वाॅर सुरूच राहिलं तर 9 महिन्याच्या आत जगभर मंदी सुरू होईल. …आणि संभाजीराजे ढसाढसा रडू लागले, पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







