कचोऱ्या विकणारा निघाला करोडपती! त्याची कमाई पाहून तुम्ही व्हाल थक्क

कचोऱ्या विकणारा निघाला करोडपती! त्याची कमाई पाहून तुम्ही व्हाल थक्क

उत्तर प्रदेशमधल्या अलिगढमध्ये सीमा टॉकिजच्या जवळ कचोरी विकणाऱ्याचं एक छोटं दुकान आहे. या दुकानात मुकेश नावाचा एक कचोरीवाला गेली 10- 12 वर्षं कचोऱ्या विकतो. या कचोरीवाल्याचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल.

  • Share this:

अलिगढ (उत्तर प्रदेश), 24 जून : उत्तर प्रदेशमधल्या अलिगढमध्ये सीमा टॉकिजच्या जवळ कचोरी विकणाऱ्याचं एक छोटं दुकान आहे. या दुकानात मुकेश नावाचा एक कचोरीवाला गेली 10- 12 वर्षं कचोऱ्या विकतो. या कचोरीवाल्याचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल.

हा कचोरीवाला दरवर्षी 60 लाख रुपये कमवतो. एवढ्या छोट्याशा दुकानात बसणारा हा कचोरीवाला एवढे पैसे कमवतो हे समोर आल्यावर करविभागाचे अधिकारीही थक्क झाले. या कचोरीवाल्याचं वार्षिक उत्पन्न एक कोटीपेक्षाही जास्त असू शकतं, असंही या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या दुकानदाराला आता करविभागाने नोटीस पाठवली आहे.

स्वत:च दिली कबुली

या कचोरीवाल्याच्या विरोधात लखनौच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर एकच खळबळ माजली. अलिगढच्या व्यापारी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कचोरीवाल्या मुकेशचा तपास केला. या तपासणीत या कचोरीवाल्याने स्वत:च आपल्या उत्पन्नाची कबुली दिली.

नियमांचं उल्लंघन

कचोऱ्या बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी वजा जाता आपल्याला दरवर्षी 60 लाख रुपये मिळतात, असं मुकेशने अधिकाऱ्यांना सांगितलं. ज्या लोकांचं उत्पन्न 40 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना जीएसटीसाठी नोंदणी करावी लागते. त्यानुसार आता या कचोरीवाल्यालाही अशी नोंदणी करणं सक्तीचं आहे.

आणखीही दुकानदारांवर नजर

मुकेश कचोरीवाल्याचं हे प्रकरण समोर आल्यानंतर आता अलिगढमधल्या बाकीच्या कचोरीवाल्यांवरही करविभागाची नजर आहे. कचोरीसोबतच मिठाई आणि दुधाचा व्यापारही यात येतो. त्यामुळे इथल्या आणखी व्यापाऱ्यांचं उत्पन्नही जीएसटीच्या कक्षेत बसणारं असेल, असा करविभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.करविभागाच्या नियमांप्रमाणे इथले कचोरी आणि मिठाईवाले आपल्या व्यापाराबद्दल कर भरणार का मात्र प्रश्नच आहे.

============================================================================================

'त्या' दिवशी मुथ्थुट फायनान्समध्ये तरुणाची कशी झाली हत्या?नांगरे पाटलांचा खुलासा

First published: June 24, 2019, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading