मुंबई : बऱ्याचदा असं होतं की रेल्वे स्टेशन किंवा प्लॅटफॉर्म किंवा अगदी काहीवेळा ट्रेनमध्ये देखील आपल्याला भूक-तहान लागली म्हणून आपण काही विकत घेतो. त्यावेळी विक्रेते आपल्याकडून MRP पेक्षा जास्त पैसे आकारतात. आपल्याला त्यावेळी गरज असते म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करून ती वस्तू विकत घेतो. खरं तर MRP पेक्षा जास्त पैसे घेणाऱ्यांविरोधात तुम्हाला अगदी लगेच बसल्या जागेवरुन तक्रार करता येते. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये खानपान आणि इतर वस्तूंची विक्री एमआरपीपेक्षा जास्त किमतीत करता येत नाही. मात्र, रेल्वे स्थानक आणि गाड्यांमधील विक्रेते या नियमाची पायमल्ली करतात. 15 रुपयांची पाण्याची बाटली 20 रुपयांना विकली जाते आणि चहासाठी रेल्वेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा 2 ते 3 रुपये जास्त मोजावे लागतात. रेल्वे प्रवासादरम्यान जर कोणी तुमच्याकडून एमआरपीपेक्षा जास्त शुल्क आकारले तर तुम्ही ट्रेनमध्ये बसून रेल्वेकडे तक्रार करू शकता. बेकायदेशीर वसुलीच्या तक्रारींसाठी, तुम्ही ट्रेनमध्ये बसून रेल्वे तक्रार हेल्पलाइन क्रमांक 139, Rail Madad अॅप आणि रेल्वे वेबसाइटद्वारे करू शकता.
ट्रेनमध्ये व्हॉट्सअपवरुन ऑर्डर करा रेस्टॉरंटमधील जेवण! रेल्वेने जारी केला नंबरप्लॅटफॉर्मवरून ट्रेनपर्यंत धावणारे विक्रेते रोज एमआरपीपेक्षा जास्त दराने चहा-पाणी विकून रेल्वे प्रवाशांची लाखो रुपयांची फसवणूक करतात. हे थांबवण्यासाठी रेल्वे मंत्रालयही प्रयत्न करत आहे. मंत्रालयानेही नो बिल, नो पेमेंटचे धोरण सुरू केले आहे. परंतु, रेल्वे प्रवाशांमध्ये जागृतीचा अभाव आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अवैध वसुली थांबत नसल्याचं समोर आलं आहे. ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर जास्त पैसे देऊन वस्तू खरेदी करणे ही तुमची सक्ती नाही. थोडी काळजी घेतल्यास अशा प्रकारचा आर्थिक छळ टाळता येईल. तुमच्यासोबत असे घडल्यास, तुम्ही रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांक 139 वर तक्रार करू शकता.
ट्रेनचं तिकीट हरवलंय तर नो टेंशन! ‘या’ पर्यायाचा करा वापरहा नंबर डायल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या तक्रारीच्या स्वरूपानुसार भाषा निवडण्यास आणि कोणताही एक नंबर दाबण्यास सांगितले जाईल. तक्रार करण्यासाठी तुम्हाला तुमचा पीएनआर क्रमांक विचारला जाईल. तुम्ही कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हशीही बोलू शकता.
1800111139 या टोल फ्री क्रमांकावरही तुम्ही अशी तक्रार करू शकता. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी एसएमएसचा पर्यायही उपलब्ध करून देते. यासाठी प्रवाशाने 9717630982 वर मेसेज करावा. हे काम अॅप आणि वेबसाइट या दोन्हींवरून करता येईल. प्रवासी http://www.coms.indianrailways.gov.in वर जाऊन अॅप डाउनलोड करू शकतात. त्याचप्रमाणे, प्रवासी त्यांच्या तक्रारी http://www.coms.indianrailways.gov.in/ या वेबपेजवर नोंदवू शकतात.