'चेतक'ला गती देणारे राहुल बजाज आता नाहीत सूत्रधार, बोर्डाने केला मोठा बदल

'चेतक'ला गती देणारे राहुल बजाज आता नाहीत सूत्रधार, बोर्डाने केला मोठा बदल

बजाज समूहाचे चेअरमन राहुल बजाज यांच्या भूमिकेत महत्त्वाचा बदल झाला आहे. राहुल बजाज कंपनीच्या निर्णयामध्ये थेट हस्तक्षेप करणार नाहीत. आता ते कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या भूमिकेत राहतील.

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी : विख्यात बिझनेसमन आणि दीर्घकाळ बजाज समूहाचे चेअरमन म्हणून धुरा सांभाळणारे राहुल बजाज यांच्या भूमिकेत महत्त्वाचा बदल झाला आहे. राहुल बजाज कंपनीच्या निर्णयामध्ये थेट हस्तक्षेप करणार नाहीत. आता ते कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या भूमिकेत राहतील.

काय झाले बदल?

राहुल बजाज 1 एप्रिल 1970 पासून कंपनीचे संचालक आहेत. 1 एप्रिल 2015 रोजी ते पुन्हा एकदा कंपनीचे संचालक झाले. 31 मार्च 2020 ला त्यांचा कार्यकाळ संपतो आहे. 1 एप्रिल 2020 पासून राहुल बजाज कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन असतील. 1972 मध्ये बजाज ऑटोने आपली चेतक स्कूटर लाँच केली. ही स्कूटर बाजारात आली आणि देशातल्या तरुणांसोबत सगळ्यांचीच लाडकी झाली. तुम्हाला हे सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही की त्याकाळी बजाजची चेतक स्कूटर घ्यायची असेल तर 4 ते 5 वर्षांचा वेटिंग पिरेड होता. आता कंपनीने याच स्कूटरचं इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच केलं आहे.

(हेही वाचा : लाखो कर्मचाऱ्यांची EPF खाती ब्लॉक, यात तुमचं खातं तर नाही ना?)

कोण आहेत राहुल बजाज?

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 चा. राहुल बजाज हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जमनालाल बजाज यांचे नातू आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन कॉलेजमध्ये इकॉनॉमिक ऑनर्स केल्यानंतर राहुल बजाज यांनी 3 वर्षं बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीमध्ये प्रशिक्षण घेतलं. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षणही घेतलं. त्यानंतर त्यांनी 60 च्या दशकात हॉवर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली.

(हेही वाचा : Brexit : 31 जानेवारीला ब्रिटन EU मधून पडणार बाहेर, भारतावर होणार हा परिणाम)

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1968 मध्ये ते 30 व्या वर्षी बजाज ऑटो लिमिटेड मध्ये सीईओ झाले. या पदावर पोहोचणारे ते सर्वात तरुण भारतीय होते. त्यांच्याकडे जेव्हा कंपनीची धुरा आली तेव्हा देशात लायसन्स राज होतं. सरकारच्या इच्छेशिवाय उद्योगपती काहीच करू शकत नव्हते.उद्योगपती, बिझनेसमन यांच्यासाठी ही कठीण परिस्थिती होती. उत्पादनालाही मर्यादा होत्या. या स्थितीत राहुल बजाज यांनी बजाज कंपनीला देशातली अग्रेसर कंपनी म्हणून नावारूपाला आणलं. आता ते कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या भूमिकेत राहतील.

================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2020 06:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading