मुंबई, 30 जानेवारी : युरोपियन युनियनच्या संसदेने ब्रेक्झिट कराराला मंजुरी दिली. त्यानंतर आता 31 जानेवारीला ब्रिटन युरोपियन युनियन (European Union) मधून अखेर बाहेर पडणार आहे. ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटबद्दल सार्वमत घेतल्यानंतर या करारातल्या तरतुदींबद्दल अनेक चर्चा झाल्या. थेरेसा मे यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानपदी आलेल्या बोरिस जॉन्सन यांनी या कराराला अंतिम स्वरूप दिलं. ब्रिटन आणि युरोपियन युनियन यांच्यासोबतच या कराराचे जगावर परिणाम होणार आहेत. ब्रिटनमध्ये 800 पेक्षा जास्त भारतीय कंपन्या आहेत. यामध्ये सुमारे 1 लाख 10 हजार लोकांना रोजगार मिळतो. यापैकी अर्ध्याहून जास्त लोक टाटा समूहाच्या 5 कंपन्यांमध्ये काम करतात. तज्ज्ञांच्या मते, ब्रेक्झिटनंतर ब्रिटनचं चलन असलेल्या पाउंडमध्ये घसरण होण्याची चिन्हं आहेत. अशा परिस्थितीत ज्या भारतीय कंपन्या ब्रिटनशी व्यवहार करतात त्यामध्ये काही बदल होतील. भारतावर काय होईल परिणाम? युरोप आणि ब्रिटनला केलेल्या निर्यातीतून भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी गंगाजळी मिळते. यूकेमध्ये गुंतवणूक करणारा भारत हा तिसरा मोठा देश आहे. एस्कॉर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इक्बाल यांच्या मते, ब्रेक्झिटमुळे भारताला फायदा होईल. ब्रिटनशी भारताचा मुक्त व्यापार करार आहे आणि ब्रिटनसोबतच भारताचा व्यापारही वाढेल. (हेही वाचा : Jio’s Got Talent : 10 सेकदांच्या व्हिडिओमुळे होऊ शकते ‘थायलंड’वारी) या कंपन्यांवर होणार परिणाम भारतातल्या कंपन्या जगभरातल्या मोठ्या कंपन्या विकत घेऊन जगभरात व्यवसाय करतात. सध्या भारतीय कंपन्यांची युरोपच्या तुलनेत यूकेमध्ये जास्त निर्यात होते. टाटा मोटर्स, टाटा स्टील, TCS, हिंडाल्को, मदरसन सुमी, भारत फोर्ज, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, सिमेन्स फार्मा, BSSF आणि अरबिंदो फार्मा या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. भारताची भूमिका महत्त्वाची रेटिंग एजन्सी असलेल्या बँक ऑफ अमेरिकाच्या रिपोर्टनुसार, ब्रिटन आणि युरोपियन युनियन या दोघांचही ब्रेक्झिटच्या प्रक्रियेत नुकसान होऊ शकतं. अशा स्थितीत दुसऱ्या पर्यायांचा विचार होणं आवश्यक आहे. भारत टेक्नॉलॉजी, सायबर सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक बाबतीत मोठा भागीदार होऊ शकतो. गुंतवणुकीच्या दृष्टीने भारताची भूमिका महत्त्वाची आहे. (हेही वाचा : पोस्ट खातेधारकांचं 1 फेब्रुवारीपासून कार्ड होणार बंद!) भारतासाठी ही चिंतेची बाब व्हीएम पोर्टफोलियोचे रिसर्च हेड विवेक मित्तल यांच्या मते, ब्रेक्झिटमुळे भारतासाठी एक चिंतेची बाब आहे. ब्रेक्झिटनंतर युरोपातले देश त्यांचे रस्ते ब्रिटनच्या लोकांसाठी बंद करतील. त्यामुळे काही अडचणी निर्माण होतील. आतापर्यंत जे लोक युरोपमध्ये राहत होते तेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी काही अडचण नव्हती. पण आता युरोपने नवे नियम आणले तर भारतीय कंपन्यांना युरोपमध्ये जाण्यासाठी नवे रस्ते तयार करावे लागतील. यामुळे खर्च वाढेल आणि वेगवेगळ्या देशांच्या कायद्यांनुसार बिझनेस करावा लागेल. आता काय होणार? 31 जानेवारीच्या रात्री 11 वाजता ब्रिटन युरोपियन युनियनमधून वेगळा होईल. ब्रेक्झिट विधेयक संसदेत मंजूर झालं आणि ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी त्यावर स्वाक्षरी केली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही त्यावर सह्या केल्या. ===============================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.