मराठी बातम्या /बातम्या /मनी /

15 जूनच्या आसपास शॉपिंग मॉल सुरू होण्याची शक्यता, सिनेमागृहांसाठी असू शकतात हे नियम

15 जूनच्या आसपास शॉपिंग मॉल सुरू होण्याची शक्यता, सिनेमागृहांसाठी असू शकतात हे नियम

15 जूनपासून शॉपिंग मॉल्स उघडू शकतात. त्यानंतर 1-2 आठवड्यानंतर सिनेमागृह उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते अशी माहिती पीव्हीआरचे एमडी अजय बिजली यांनी दिली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 18 मे : भारतामध्ये लॉकडाऊनचा (Coronavirus Lockdown) चौथा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. 14 दिवसांचा लॉकडाऊन आणखी वाढवल्यानंतर हा टप्पा 31 मे रोजी संपणार आहे. याबाबात CNBC TV18 बरोबर PVR चे चेयरमन आणि एमडी अजय बिजली (PVR CMD Ajay Bijli) यांनी बातचीत केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जूनपासून शॉपिंग मॉल्स उघडू शकतात. त्यानंतर 2-3 आठवड्यानंतर सिनेमागृह उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून देशभरात शॉपिंग मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद आहेत.

एनडीएमए कडून केंद्र आणि राज्य सरकारांना देशभरात लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर गृहमंत्रालयाने गाईडलाइन्स जारी करत लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याबाबत घोषणा केली. यानुसार सिनेमागृह, शॉपिंग मॉल, जिम, स्वीमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, नाट्यगृह, ऑडिटोरियम आणि असेंबली हॉल्स बंद राहणार आहेत.

(हे वाचा-कुणाच्या डोळ्यात पाणी तर चिमुरडे भुकेने व्याकुळ, हृदय पिळवटून टाकणारे PHOTO)

अजय बिजली यांनी अशी माहिती दिली की, सिनेमागृहांमध्ये बसण्याच्या रचनेत देखील काही बदल करण्यात येतील. जसं की एखादं कुटुंब किंवा ग्रृपला एकत्र बसता येईल, दुसरा ग्रृप काहीशा अंतराने बसवावा लागेल. लॉकडाऊन नंतर सर्वाधिक चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. कारण सर्वांनाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करणे शक्य नाही आहे.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवरून 15 मे रोजी पीव्हीआरने एक निवेदन जारी केले आहे. यातून त्यांनी चित्रपट निर्मात्यांना विनंती केली होती की, त्यांनी चित्रपटांचे प्रदर्शन थिएटर सुरू होईपर्यंत थांबवावे. पीव्हीआर पिक्चर्सचे सीईओ कमल ज्ञानचंदानी यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'आमचा असा विश्वास आहे की थिएटर रिलीज आमच्या चित्रपट निर्मात्यांची मेहनत आणि रचनात्मक प्रतिभेचा अनुभव देण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. असे केवळ भारतातच नाही, जगभरात असेच आहे'.

(हे वाचा-लॉकडाऊनध्ये एवढा बदलला बॉलिवूड अभिनेता, ओळखणं सुद्धा झालं कठीण)

संपादन - जान्हवी भाटकर

First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Theatres