लॉकडाऊनध्ये एवढा बदलला बॉलिवूड अभिनेता, ओळखणं सुद्धा झालं कठीण

लॉकडाऊनध्ये एवढा बदलला बॉलिवूड अभिनेता, ओळखणं सुद्धा झालं कठीण

लॉकडाऊनच्या काळात एक बॉलिवूड अभिनेता एवढा बदलला आहे की त्याला ओळखणं सुद्धा कठिण झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मे : सध्या कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वांनाच वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशात केंद्र सरकारनं लॉकडाऊन आता 31 मे पर्यंत वाढवलं आहे. मागच्या बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनमुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा आपापल्या घरी आहेत. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. पण या लॉकडाऊनच्या काळात एक बॉलिवूड अभिनेता एवढा बदलला आहे की त्याला ओळखणं सुद्धा कठिण झालं आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या त्याच्या व्हिडीओमुळे खूप चर्चेत आहे. त्यानं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये लॉकडाऊनमुळे अर्जुनचा एकूणच अवतार बदलेला पहायला मिळत आहे. त्याची दाढी आणि केस वाढले आहेत आणि तो दाढी आणि केस कापण्याविषयी आपल्या गर्लफ्रेंडसोबत बोलत आहे.

या व्हिडीओमध्ये अर्जुन गॅब्रिएलाला सांगितो, आता हे लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. पण आता मी माझे केस आणि दाढी आणखी वाढवू शकत नाही. त्यामुळे आता यात गॅब्रिएला माझी मदत करणार आहे. अर्जुन आणि गॅब्रिएलाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. कारण या वाढलेल्या दाढी आणि केसांमुळे अर्जुनला ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे.

View this post on Instagram

It’s started 😅

A post shared by Arjun (@rampal72) on

सध्या लॉकडाऊनमुळे अर्जुन त्याच्या फॅमिलीसोबत क्वारंटाइन आहे. पण सोशल मीडियावर मात्र तो खूप सक्रिय आहे. तो नेहमीच त्याच्या मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अर्जुन आणि गॅब्रिएला यांना एक मुलगा असला तरी त्यांनी अद्याप लग्न केलं नाही. आता कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे त्यांचा हा प्लान सुद्धा लांबला आहे.

First published: May 18, 2020, 4:30 PM IST

ताज्या बातम्या