मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Paytm Cashback Dhamaka: दिवाळी शॉपिंग करतानाच व्हाल मालामाल! 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

Paytm Cashback Dhamaka: दिवाळी शॉपिंग करतानाच व्हाल मालामाल! 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी सणासुदीच्या काळात (Paytm Cashback Dhamaka) 100 कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफरही जाहीर केल्या आहेत. पेटीएमच्या मते, ते आपल्या ग्राहकांसाठी बंपर कॅशबॅक देत आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 23 ऑक्टोबर: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. काहींचं दिवाळी शॉपिंग पूर्ण झालं असेल तर काहीजण अजूनही शॉपिंग करणार आहेत, अशाप्रकारे शॉपिंगचा प्लॅन दिवाळीत केलाच जातो. दरम्यान ऑनलाइन शॉपिंग करणार असाल आणि त्यातून तुम्हाला कॅशबॅकसह 1 लाख रुपये मिळाले तर तुमची दिवाळी खऱ्या अर्थाने Happy होईल. यावेळी सणासुदीच्या काळात अनेक कंपन्या अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक ऑफर्स घेऊन येत आहेत. पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी सणासुदीच्या काळात (Paytm Cashback Dhamaka) 100 कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफरही जाहीर केल्या आहेत. पेटीएमच्या मते, ते आपल्या ग्राहकांसाठी बंपर कॅशबॅक देत आहे.

1 लाख मिळवण्याची संधी

पेटीएमच्या या ऑफरमध्ये तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम जिंकण्याची संधी आहे. एक लाख रुपये जिंकण्यासाठी तुम्हाला पेटीएमवरुन डिजिटल पेमेंट आणि पेटीएमची सेवा वापरावी लागेल. कॅशबॅक ऑफरसोबतच पेटीएमने यूपीआय प्रमोशन, 'बाय पे पे लेटर' आणि 'वॉलेट बिझनेस' वर सुद्धा आकर्षक ऑफर्सही सुरू केल्या आहेत. डिजिटल पेमेंट कंपनी Paytm ने ग्राहकांसाठी Paytm Cashback Dhamaka सुरू केला आहे. भारतातील सर्व लोकांना यातून पैसे जिंकण्याची संधी आहे.

वाचा-100 GW सौरऊर्जेसाठी Reliance ची जगातील आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारी

पेटीएमने सांगितले की ते सणासुदीच्या हंगामात दररोज 10 विजेत्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस देईल. 10,000 विजेत्यांना रु. 100 पर्यंत कॅशबॅक मिळेल. तर इतर 10,000 विजेत्यांना 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. 1 ते 3 नोव्हेंबर या सणासुदीच्या काळात युजर्सना दररोज 10 लाख रुपये जिंकण्याची संधी मिळेल.

पेटीएमने या Festive Season मध्ये 100 कोटी रुपयांची भेट देण्याची घोषणा केली आहे. या ऑफर्समागील एटीएमचा उद्देश डिजिटल पेमेंटना प्रोत्साहन देणे, मनी ट्रान्सफर, पेटीएम वॉलेट आणि पेटीएम पोस्टपेडसाठी पेटीएम यूपीआयचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी युजर्सना जागरुक करणे आहे. ही ऑफर 14 नोव्हेंबरपर्यंत चालेल.

वाचा-Good News : यंदा दिवाळीत अवघ्या 1 रुपयात खरेदी करा Digital Gold;जाणून घ्या पद्धत

कशावर मिळणार Cashback?

तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर पेटीएम वरून ब्रॉडबँड बिल, डीटीएच रिचार्ज, युटिलिटी बिल पेमेंट, मनी ट्रान्सफर, तिकीट बुकिंग, क्रेडिट कार्ड बिल पेमेंट, मूव्ही तिकीट बुकिंग, फास्टॅग रिचार्ज किंवा ऑनलाइन आणि ऑफलाइन किराणा स्टोअर पेमेंट केल्यास तुम्हाला कॅशबॅक जिंकण्याची संधी मिळेल.

First published:

Tags: Paytm, Paytm Money, Paytm offers