Home /News /money /

PNB च्या या स्कीममध्ये 5000 रुपये दरमहा गुंतवून मिळवा 68 लाख, वाचा सविस्तर

PNB च्या या स्कीममध्ये 5000 रुपये दरमहा गुंतवून मिळवा 68 लाख, वाचा सविस्तर

Punjab National Bank

Punjab National Bank

पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास स्कीम आणली आहे, जी ग्राहकांसाठी सुरक्षित आहे. या योजनेत तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसह आणखी काही फायदेही मिळतील.

    नवी दिल्ली, 11 मे: देशातील दुसरी मोठी सरकारी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank- PNB) ग्राहकांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि टेन्शन फ्री करण्यासाठी एक खास योजना देते आहे. सरकारच्या या योजनेचे नाव NPS (National Pension System) आहे. तुम्ही देखील या योजनेमध्ये पैसे गुंतवले तर निवृत्तीनंतर तुम्हाला 68 लाख रुपये एकरकमी मिळू शकतात. बँकेच्या या योजनेत तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसह आणखी काही फायदेही मिळतील. वाचा सविस्तर काय आहे नॅशनल पेन्शन स्कीम? नॅशनल पेन्शन स्कीम एक सरकारी रिटायरमेट सेव्हिंग स्कीम आहे, जी केंद्र सरकारने 2004 मध्ये लाँच केली होती. 2009 मध्ये ही  योजना खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी देखील खुली करण्यात आली. आता सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात काम करणारा कर्मचारी त्यांच्या मर्जीने या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेचे फायदे -पंजाब नॅशनल बँकेची खास योजना असणाऱ्या NPS मध्ये पैसे गुंतवून तुम्ही निवृत्तीनंतर टेन्शन फ्री आयुष्य जगू शकता -आकर्षक मार्केट लिंक्ड रिटर्न मिळतो -हा पेन्शन फंड आणि गुंतवणूकीचा पर्याय आहे हे वाचा-तुमचं SBI सॅलरी अकाउंट आहे का? स्वस्त लोन आणि लॉकरसह मिळतील हे 5 मोठे फायदे -इन्कम टॅक्स कायदा 80CCD (1B) अंतर्गत यामध्ये 50,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळते. -ही सूट  80C अंतर्गत असणाऱ्या दीड लाखाच्या सवलतीव्यतिरिक्त आहे. कोण करू शकतं गुंतवणूक? नॅशनल पेन्शन स्कीममध्ये 18 ते 60 वर्ष वय असणारे कर्मचारी गुंतवणूक करू शकतात. देशातील जवळपास सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये या योजनेमध्ये गुंतवणूक करता येईल. कसे मिळतील 68 लाख? तुम्हाला या योजनेत दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक 30 वर्षांकरता करावी लागेल. यानंतर तुमचे एकूण योगदान 18 लाख रुपये होईल. त्याच वेळी, जर तुम्हाला गुंतवणूकीवर 10 टक्के दराने अंदाजित परतावा मिळाला तर मॅच्युरिटीची एकूण रक्कम 1.13 कोटी रुपये असेल. - अॅन्युटीची खरेदी 40 टक्के -अंदाजित अॅन्युटी रेट 8 टक्के -टॅक्स फ्री विड्रॉल मॅच्युरिटी अमाउंटच्या 60 टक्के -60 वर्षांचे झाल्यावर पेन्शन रक्कम दरमहा 30,391 -एकरकमी रोखरक्कम-68.37 लाख रुपये हे वाचा-खूशखबर! अक्षय तृतीयेला खरेदी करा स्वस्त सोनं, आजही सोन्याचांदीच्या दरात घसरण मॅच्युरिटीआधी पैसे काढण्याची सुविधा NPS मध्ये तुम्ही काही ठराविक परिस्थितीत मॅच्युरिटीआधी देखील पैसे काढू शकता. उदा. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा घर खरेदी करण्याची योजना आखत असाल तर तुम्ही पैसे काढू शकता. याशिवाय तुम्ही लग्न, मुलांचं शिक्षण आणि लिस्टेड आजारांच्या उपचारासाठी देखील पैसे काढू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Investment, Money, Pension, Punjab national bank

    पुढील बातम्या