मराठी बातम्या /बातम्या /मनी /खूशखबर! अक्षय तृतीयेला खरेदी करता येईल स्वस्त सोनं, आजही सोन्याचांदीच्या दरात घसरण

खूशखबर! अक्षय तृतीयेला खरेदी करता येईल स्वस्त सोनं, आजही सोन्याचांदीच्या दरात घसरण

Gold Price Today: तुम्ही जर अक्षय तृतीयेदिवशी (Akshaya Tritiya 2021) सोनेखरेदीचा विचार करत असाल, तर तुम्हाला स्वस्त सोनं मिळण्याची शक्यता आहे. कारण आज देखील सोन्याचांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.

Gold Price Today: तुम्ही जर अक्षय तृतीयेदिवशी (Akshaya Tritiya 2021) सोनेखरेदीचा विचार करत असाल, तर तुम्हाला स्वस्त सोनं मिळण्याची शक्यता आहे. कारण आज देखील सोन्याचांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.

Gold Price Today: तुम्ही जर अक्षय तृतीयेदिवशी (Akshaya Tritiya 2021) सोनेखरेदीचा विचार करत असाल, तर तुम्हाला स्वस्त सोनं मिळण्याची शक्यता आहे. कारण आज देखील सोन्याचांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.

नवी दिल्ली, 11 मे: तुम्ही जर अक्षय तृतीयेदिवशी (Akshaya Tritiya 2021) सोनेखरेदीचा विचार करत असाल, तर तुम्हाला स्वस्त सोनं मिळण्याची शक्यता आहे. कारण आज देखील भारतीय बाजारात सोन्याचांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi commodity exchange)वर आज सकाळी सोन्याचे दर (Gold Price Today) उतरले आहेत. याठिकाणी चांदी देखील (Silver Price Today) स्वस्त झाली आहे.  MCX वर सोन्याची वायदे किंमत 0.7 टक्क्याने घसरून 47,918 रुपये प्रति  तोळा झाली आहे. तर चांदीची किंमत 0.25 टक्क्याने कमी होत  71,364 प्रति किलो झाली आहे. अशाप्रकारे घसरण आणखी काही दिवस होत राहिल्यास तुम्हाला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्वस्त सोनं खरेदी करता येईल.

रेकॉर्ड स्तरापेक्षा सोनं आजही स्वस्त

जर तसं पाहिलं गेलं तर सोन्याचे दर आजही रेकॉर्ड स्तरावरून खूप कमी आहेत. तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किंमतीत तेजी येण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर 52000 रुपये प्रति तोळावर जातील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हे वाचा-तुमचं SBI सॅलरी अकाउंट आहे का? स्वस्त लोन आणि लॉकरसह मिळतील हे 5 मोठे फायदे

सोन्याचे नवे दर (Gold Price on 11th May 2021)

आज सोन्याचे दर 0.7 टक्क्यांनी घसरून 47,918 रुपये प्रति 10 ग्रॅम या स्तरावर पोहोचले आहेत. रेकॉर्ड स्तरापेक्षा ही किंमत खूप कमी आहे.

चांदीचे नवे दर ( Silver Price on 11th May 2021)

आज चांदीची झळाळी देखील उतरल्याचं पाहायला मिळाली. चांदीची किंमत 0.25% ने घसरून 71,364 प्रति किलो झाली आहे.

कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता?

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

हे वाचा-SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बचत खातं घरबसल्या करा दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर

या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today