जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी; हायकोर्टात जाण्याची तयारी

PMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी; हायकोर्टात जाण्याची तयारी

PMCचं विलिनीकरण खाजगी किंवा सरकारी बँकेत करावं, ठेवीदारांची मागणी; हायकोर्टात जाण्याची तयारी

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Punjab and Maharashtra Co-operative Bank -PMC) ठेवीदारांनी मुंबई हायकोर्टात जाण्याची योजना आखली आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जून: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Punjab and Maharashtra Co-operative Bank -PMC) ठेवीदारांनी मुंबई हायकोर्टात जाण्याची योजना आखली आहे. ठेवीदारांची रक्कम लवकरात लवकर बँकेने परत करावी अशी मागणी ठेवीदारांकडून केली जात आहे. ठेवीदारांच्या मते त्यांची थकबाकी कधी परत केली जाईल याबाबत रेग्यूलेटर किंवा बँकेकडून कोणतही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. याशिवाय ठेवीदारांनी PMC बँकेचं कोणत्याही दुसऱ्या खाजगी किंवा सरकारी बँकेत विलिनीकरण करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते यामुळे आर्थिक संकटाच्या समस्येचं निरसन होईल.  PMC Bank च्या डिपॉझिटर्स अॅक्शन टीमचे कोऑर्डिनेटर मंजीन सभरवाल  (Manjeet Sabharwal) यांनी मनीकंट्रोलशी बोलताना असं म्हटलं आहे की, PMC बँकेचे ठेवीदार RBI आणि PMC बँकेच्या बोर्डाविरोधात अपील करण्याच्या तयारीत आहेत. हे वाचा- मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! नाही वाढणार प्रॉपर्टी टॅक्स त्यांनी असं म्हटलं आहे की, येणाऱ्या काही दिवसांत हे ठेवीदार कोर्टात याचिका दाखल करू शकतात. याकरता काही वकिलांच्या सहयोगाने पीटिशनची तयारी देखील केली जात आहे. मंजीत यांनी अशी माहिती दिली की ते रिफंडसाठी आणखी चार-सहा महिने थांबण्यासाठीच्या स्थितीत नाही आहेत. हे आर्थिक संकट सुरू होऊन आता जवळपास 20 महिने झाले आहेत. आता आम्ही आणखी वाट पाहू शकत नाही. हे वाचा- खूशखबर! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आतापर्यंत 9000 रुपयांनी कमी झाले दर 18 जून रोजी RBI ने सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेज लिमिटेडला (Centrum Financial Services Limited) एक स्मॉल फायनान्स बँक बनवण्यासाठी सिद्धांतिक मंजुरी दिली होती. यामुळे PMC बँकेच्या टेकओव्हरचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या संभावित अधिग्रहणामुळे ठेवीदार नाराज असल्याची माहिती मिळते आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की बँकेचे अधिग्रहण चालू खाजगी किंवा सरकारी बँकेद्वारे झालं पाहिजे. त्यामुळे सर्व समस्या सूटतील असं ठेवीदारांचं म्हणणं आहे. सभरवाल यांनी असं म्हटलं आहे की, बँकेतील आर्थिक समस्यांमुळे आधीच 150 जणांनी प्राण गमावले आहेत. या लोकांनी त्यांची आयुष्यभराची कमाई या बँकेत ठेवली होती

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात