मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! नाही वाढणार प्रॉपर्टी टॅक्स

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! नाही वाढणार प्रॉपर्टी टॅक्स

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती (Coronavirus in Mumbai) सुधारत नाही तोपर्यंत मुंबईमध्ये प्रॉपर्टी टॅक्समध्ये (Property Tax) कोणतीही वाढ होणार नाही

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 20 जून: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती (Coronavirus in Mumbai) सुधारत नाही तोपर्यंत मुंबईमध्ये प्रॉपर्टी टॅक्समध्ये (Property Tax) कोणतीही वाढ होणार नाही. महापौरांनी अशी माहिती दिली की, मुंबईकरांवर कोणताही अतिरिक्त भार लादण्यात येणार नाही. कोरोनाची परिस्थिती असल्याने यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आम्हाला माहित नाही की अशी परिस्थिती कधीपर्यंत राहिल.

याआधी अशी अपेक्षा केली जात होती की यावर्षी मुंबईकरांना अतिरिक्त मालमत्ता कर (Property Tax) द्यावा लागेल. पेडणेकर यांनी असं स्पष्ट केलं की प्रॉपर्टी टॅक्स वाढण्याचा केवळ प्रस्ताव आला आहे, त्याला मंजुरी मिळालेली नाही. प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्याच्या प्रस्तावावर विरोध पक्षातील नेत्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता.

दर पाच वर्षांनी प्रॉपर्टी टॅक्समध्ये होतो बदल

बीएमसीच्या कायद्यानुसार मुंबईत दर पाच वर्षांनी मालमत्ता करात बदल होतो. 2015 मध्ये त्यात सुधारणा झाली. यानंतर, 2020 मध्येच त्यात सुधारणा करण्यात येणार होती, परंतु कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकारने ही वाढ पुढे ढकलली. मार्च 2020 मध्ये पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने काही करात सवलत जाहीर केली होती.

हे वाचा-500 रुपयाची जुनी नोट बदलून मिळवा 10000 रुपये, वाचा काय आहे प्रक्रिया

या सवलतीत पुढील 2 वर्षांसाठी 1% मुद्रांक शुल्क सूट समाविष्ट आहे. यासह, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात कागदपत्रांच्या नोंदणीवर लागू असलेल्या इतर संबंधित शुल्कामध्ये सवलत देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे राज्य सरकारने 31 डिसेंबर 2020 पर्यंत फ्लॅटवरील मुद्रांक शुल्क 5 टक्क्यांवरून 2 टक्क्यांवर आणि 31 मार्च 2020 पर्यंत 3 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता.

First published:

Tags: Mumbai