Gold Price Today: खूशखबर! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आतापर्यंत 9000 रुपयांनी कमी झाले दर

Gold Price Today: खूशखबर! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आतापर्यंत 9000 रुपयांनी कमी झाले दर

सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold-Silver) गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण होत आहे. सर्वोच्च स्तरावरुन सोन्याचे दर 9000 रुपयांनी कमी झाले आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) व्यवहार बंद होत असताना देखील सोन्याचे दर कमी झाले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जून: सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold-Silver) सातत्याने घसरण होत आहे. तुम्ही देखील सोनेखरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.  शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) व्यवहार बंद होत असताना देखील सोन्याचे दर कमी झाले होते. याठिकाणी ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत (Gold Price Today) 158.00 रुपयांनी कमी झाली आहे, या घसरणीनंतर सोन्याचा दर प्रति तोळा 46,800 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या वायदे किंमतीतही (Silver Price Today) किरकोळ घसरण झाली आहे. जुलैच्या डिलिव्हरीच्या चांदीचे दर 19 रुपयांनी कमी होऊन 67,580.00 रुपये प्रति किलोच्या स्तरावर बंद झाले आहेत.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर रेकॉर्ड हायवर पोहोचले होते. तेव्हापासून आतापर्यंत दर 9000 रुपयांनी कमी झाले आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळाच्या स्तरावर पोहोचले होते.

हे वाचा-PPF मध्ये पैसे गुंतवल्यावर मिळतील 1 कोटी, वाचा कसे व्हाल करोडपती?

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली होती. अमेरिकेत सोन्याचा दर 12.47 डॉलरने घसरला आहे, यानंतर सोन्याचे दर 1,764.31 डॉलर प्रति औंस या स्तरावर बंद झाले आहेत. चांदीच्या दरातही 0.22 डॉलरची घसरण झाली आहे, यानंतर दर 25.80 डॉलरच्या स्तरावर पोहोचले होते.

24 कॅरेट सोन्याचा दर

24 कॅरेट सोन्याबाबत बोलायचे झाले तर दिल्लीमध्ये 20 जून रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50330 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये दर 48290 रुपये, मुंबईमध्ये 47220 रुपये आणि कोलकातामध्ये 48910 रुपये प्रति तोळा असे दर आहेत.

IBJA वेबसाइटच्या मते काय आहेत या आठवड्यातील सोन्याचे दर (भाव प्रति तोळा)

>> 14 जून 2021 - 48475

>> 15 जून 2021 - 48619

>> 16 जून 2021 - 48529

>> 17 जून 2021 - 47611

>> 18 जून 2021 - 47201

हे वाचा-500 रुपयाची जुनी नोट बदलून मिळवा 10000 रुपये, वाचा काय आहे प्रक्रिया

कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता?

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 20, 2021, 4:42 PM IST

ताज्या बातम्या