नवी दिल्ली, 15 मे : करोडपती बनण्याचे स्वप्न अनेकांचे असते. काही जण त्यामध्ये यशस्वी होतात तर काहींना हार मानावी लागते. दरम्यान जर तुम्हाला देखील करोडपती बनायचे असेल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते. या योजनेअंतर्गत तुम्ही जे पैसे गुंतवणार आहात, त्याची गॅरंटी सरकार घेते परिणामी तुमचा पैसा सुरक्षित राहतो. त्यामुळे सरकारच्या स्मॉल सेव्हिंग्स स्कीम्स (Small Savings Schemes) मध्ये बचत करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. यातून एकप्रकारे चांगला रिटर्न गुंतवणूकदारांना मिळू शकतो. या स्मॉल सेव्हिंग स्कीम्सपैकी एक आहे ते म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF- Public Provident Fund). या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला चांगले व्याज तर मिळतेच पण त्याचबरोबर काही प्रसंगी करातून देखील सूट मिळते.
(हे वाचा-मोदी सरकारने शेतकऱ्यांना पाठवले 2000 रुपये, वाचा पैसे आले नसल्यास काय कराल)
या योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त एका वर्षात 1.50 लाख गुंतवणूक करू शकता. कोणत्याही आर्थिक वर्षामध्ये यापेक्षा जास्त गुंतवणूक करता येणार नाही. आयकराच्या जुन्या व्यवस्थेनुसार वार्षिक 1.50 लाखाच्या गुंतवणुकीवर करामध्ये सूट देखील मिळते. EEE अंतर्गत काही फायदे देखील या योजनेअंतर्गत मिळतात.
केंद्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या माहितीनुसार पीपीएफवर 7.1 टक्के व्याज मिळत आहे. नियमांनुसार पीपीएफच्या मॅच्युरिटीचा काळ 15 वर्षांचा असतो. जर तुम्हाला 35 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हा काळ वाढवून घ्यावा लागेल. फॉर्म एच (Form H) भरून तुम्ही हा काळ 5-5 वर्षांसाठी वाढवून घेऊ शकता. यासाठी कोणतही मर्यादा नाही. तुम्ही कितीही वेळा हा कालावधी वाढवू शकता.
(हे वाचा-वन नेशन वन रेशन कार्ड; अर्थमंत्र्यांच्या 9 मोठ्या घोषणा)
पीपीएफ कॅलक्यूलेटर (PPF Calculator)नुसार कोणतीही व्यक्ती 15 वर्ष वयाची असल्यापासून दर महिन्याला या योजनेत 6 हजार रुपयांची गुंतवणूक करत असेल तर 35 वर्षांनंतर निवृत्तीवेळी ही रक्कम एक कोटींपेेक्षा जास्त होईल. त्याचप्रमाणे दर महिना 12,500 रुपयांची अर्थात वार्षिक 1.50 लाख रुपये इतकी गुंतवणूक करता येईल. अशाप्रकारे जर तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के व्याजदराच्या हिशोबाने 15 वर्षानंतर ही मॅच्यूरिटी रक्कम 42. 60 लाख रुपयांच्या जवळपास जाईल. फॉर्म एच भरून ही मुदत तुम्ही दोन वेळा वाढवून आणखी 10 वर्ष केल्यास एकूम 25 वर्षांनी तुम्हाला 1 कोटी इतकी रक्कम मिळेल.
संकलन, संपादन - जान्हवी भाटकर