1 एप्रिलपासून PNBसह 10 बँकांचे होणार विलीनीकरण, जाणून घ्या ग्राहकांच्या खात्यावर होणारे परिणाम

1 एप्रिलपासून PNBसह 10 बँकांचे होणार विलीनीकरण, जाणून घ्या ग्राहकांच्या खात्यावर होणारे परिणाम

10 महत्त्वाच्या बँकाचे विलीनीकरण 1 एप्रिलपासून होणार आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती असली तरीही हे विलीनीकरण होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : 10 महत्त्वाच्या बँकाचे विलीनीकरण 1 एप्रिलपासून होणार आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती असली तरीही हे विलीनीकरण होणार आहे. 4 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेमध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठ्या बँकांच्या विलीनीकरण (PSU Bank Merger) करण्यास मंजूरी मिळाली होती. अर्थ मंत्रालयाकडून 30 ऑगस्ट 2019 ला विलीनीकरणाबतची घोषणा करण्यात आली होती. यासंदर्भात सरकारकडून नोटिफिकेशन सुद्धा जारी करण्यात येईल. त्यानंतर देशामध्ये 4 मोठ्या बँका अस्तित्वात येतील. 1 एप्रिल 2020 पासून या बँकांचा कारभार सुरू होण्याची शक्यता आहे.

(हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात RBI कडून रेपो रेटमध्ये मोठी कपात, गृहकर्ज होणार स्वस्त)

बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पुढे ढकलण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे का, असा प्रश्न विचारला असता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले की, ‘सध्या असा कोणताही विचार नाही आहे.’ देबाशीश पांडा यांनी माहिती दिली की विलीनीकरणाची प्रक्रिया योग्य रुळावर आहे. बँकिंग क्षेत्र कोरोनाशी लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन (AIBOC)ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बुधवारी विलीनीकरणाची प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

(हे वाचा-रेपो दरात कपात करण्याव्यतिरिक्त RBI च्या 5 महत्त्वाच्या घोषणा)

मीडिया अहवालानुसार विलीनीकरण झाल्यानंतर या बँकांची नावं देखील बदलण्यात येतील. दरम्यान सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विलीनीकरण करण्याची घोषणा करताना असं सांगितलं होतं की, हे विलीनीकरण झाल्यानंतर देशामध्ये सरकारी बँकांची संख्या 12 वर येईल. 2017 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 होती. याआधी देना बँक आणि विजया बँक, बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाली होती.

कोणती बँक कोणत्या बँकेत होणार विलीन?

-पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक विलीन होईल. यानंतर तयार होणारी बँक देशातील दुसरी मोठी बँक असेल. या बँकेचा व्यवहार 17 लाख कोटींचा असेल.

-कॅनरा बँकेबरोबर सिंडीकेट बँकेचं विलीनीकरण होईल. यानंतर बनणारी बँक देशातील चौथी मोठी बँक असेल. या बँकेचा व्यवहार 15.20 लाख कोटींचा असेल.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये बँकाची काम सुरूच,महत्त्वाचं काम असेल तर जाणून घ्या बदललेल्या वेळा)

-युनियन बँकेचं आंध्रा बँक आणि कॉरपोरेशन बँकेबरोबर विलीनीकरण होईल. यानंतर बनणारी बँक देशातील पाचवी मोठी बँक असेल. या बँकेचा व्यवहार 14.59 लाख कोटींचा असेल.

-इंडियन बँकेबरोबर अलाहाबाद बँकेचं विलीनीकरण होईल. यानंतर बनणारी बँक देशातील सातवी मोठी बँक असेल. या बँकेचा व्यवहार 08.08 लाख कोटींचा असेल.

ग्राहकांवर होणार परिणाम

विलीनकरण झाल्यानंतर ग्राहकांना नवीन अकाउंट नंबर आणि कस्टमर आयडी मिळू शकतो. ज्या ग्राहकांना नवीन अकाउंट किंवा IFSC कोड मिळेल, त्यांना ही माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंट, इन्शुरन्स कंपनी, म्युच्यूअल फंड, नॅशनल पेंशन स्कीम इत्यादी ठिकाणी अपडेट करावी लागेल. SIP किंवा लोनच्या EMI साठी ग्राहकांना नवीन इन्स्ट्रक्शन फॉर्म भरावा लागेल.

त्याचप्रमाणे ग्राहकांना नवीन चेकबुक, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड देण्यात येण्याची शक्यता आहे. एफडी किंवा आरडीवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही परिणाम होणार नाही. ज्या व्याजदरांवर ग्राहकांनी घर कर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेतलं आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. बँकेच्या काही शाखा बंद होऊ शकतात.

First published: March 27, 2020, 1:36 PM IST

ताज्या बातम्या