EPFO कडून कर्मचाऱ्यांना मिळणार झटका? PF वरील व्याजदरात घट होण्याची शक्यता

EPFO कडून कर्मचाऱ्यांना मिळणार झटका? PF वरील व्याजदरात घट होण्याची शक्यता

आर्थिक वर्ष 2020-21 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मिळणाऱ्या व्याजदरांची (EFP Interest Rates) घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल. ईपीएफओ (EPFO) ने सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्‍टीजना (CBT) श्रीनगरमध्ये 4 मार्च 2021 च्या बैठकीबाबत माहिती दिली आहे. अशी शक्यता आहे की यावेळी व्याजदर 8.5 टक्क्यांपेक्षा कमी केला जाऊ शकतो

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी: आर्थिक वर्ष 2020-21 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मिळणाऱ्या व्याजदरांची  (EFP Interest Rates) घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल. ईपीएफओ (EPFO) ने सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्‍टीजना (CBT) श्रीनगरमध्ये 4 मार्च 2021 च्या बैठकीबाबत माहिती दिली आहे. या बैठकीमध्ये ईपीएफओची कमाई आणि आर्थिक परिस्थीती (Earning and Financial Situation) यांचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल. या बैठकीमध्ये आर्थिक वर्ष 2020-21 साठी व्याजदरांची घोषणा करण्यासाठीच्या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

का घटवला जाईल EPF वरील व्याजदर?

ईपीएफओचे एक विश्वस्त केई रघुनाथन म्हणाले की, त्यांना 4 मार्चला श्रीनगर येथे सीबीटीच्या पुढील बैठकीबाबतची सूचना सोमवारी मिळाली. बैठकीचा अजेंडा लवकरच समजेल. ते म्हणाले की, बैठकीशी संबंधित ई-मेलमध्ये व्याज दरावरील कोणत्याही चर्चेचा उल्लेख नाही. दरम्यान, अशी शक्यता वर्तविली जात आहे की ईपीएफओ 2020-21 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर कमी होऊ शकतो.

(हे वाचा-या महिन्यात तुमच्या LPG गॅसवर किती मिळेल सबसिडी? अशाप्रकारे घरबसल्या तपासा)

2019-20 साठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर 8.5 टक्के होता. असा अंदाज आहे की, कोरोना काळात पीएफमधून जास्त पैसे काढल्यामुळे आणि कमी योगदान झाल्यामुळे व्याज कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

2020 मध्ये व्याज घटवून देण्यात आलं होतं 7 वर्षातील सर्वात कमी व्याज

मार्च 2020 मध्ये ईपीएफओने आर्थिक वर्ष 2019-20 साठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर कमी कर त 8.5 टक्के केला होता. गेल्या काही वर्षातील हे सर्वात कमी व्याज आहे. याआधी 2012-13 मध्ये व्याजदर 8.5 टक्के करण्यात आला होता.

(हे वाचा-PM Kisan योजनेच्या यादीत नाव येण्यासाठी करा हे काम, अन्यथा मिळणार नाहीत पैसे)

आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये पीएफ सब्सक्रायबर्सना 8.65 टक्के व्याज मिळत होते, 2016-17 मध्ये हे व्याज 8.65 टक्क्यांनी मिळत होते, 2017-18 आणि 2015-16 साठी व्याजदर  8.8 टक्के होता. 2013-14 साठी पीएफच्या रकमेवरील व्याजदर 8.75 टक्के होता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 17, 2021, 8:53 AM IST

ताज्या बातम्या