PM Kisan Scheme: शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीत नाव येण्यासाठी करा हे काम, अन्यथा मिळणार नाहीत पैसे

PM Kisan Scheme: शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीत नाव येण्यासाठी करा हे काम, अन्यथा मिळणार नाहीत पैसे

PM Kisan Samman Nidhi Scheme: मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. नेहमीप्रमाणे या वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जाईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Scheme) देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात.  आतापर्यंत शेतकऱ्यांना सात हप्त्यांमध्ये मोदी  सरकारने पैसे पाठवले आहेत. लवकरच आठवा हप्ता देखील केंद्र सरकारकडून पाठवण्यात येणार आहे. दरम्यान सरकारकडून या योजनेच्या व्यवस्थेमध्ये काही बदल केले जाणार आहेत. आता पीएम शेतकरी सन्मान निधीचा फायदा त्यांना घेता येईल ज्यांच्या नावावर शेत असेल. अर्थात पूर्वीप्रमाणे ज्यांच्याकडे वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30  नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. याही वर्षी टप्प्याटप्प्याने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील.

(हे वाचा-पेट्रोल-डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर, या शहरात पेट्रोलचे दर शंभरी पार)

आता द्यावी लागणार ही माहिती

2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत गेल्या काही दिवसांपासून काहीसा गोंधळ पाहायला मिळतो आहे. यात सुधारणा करण्याचा सरकारचा निर्णय आहे. या योजनेत पारदर्शकता यावी याकरता सरकारने हे पाऊल उचलले आहे. शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत नवीन नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना आता अर्जाच्या नमुन्यात आपला भूखंड क्रमांक नमूद करावा लागेल. दरम्यान नवीन नियमांचा या योजनेशी संबंधित जुन्या लाभार्थ्यांवर परिणाम होणार नाही.

योजनेसाठी करू शकता ऑनलाइन रजिस्ट्रेशन

या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. तुम्ही घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही पंचायत सचिव किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर्सद्वारे या योजनेसाठी अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही स्वत: या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी देखील करू शकता.

-याकरता तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल

-त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा

(हे वाचा-SBI च्या या योजनेत गुंतवणूक करून मिळवा दरमहा 10000, वाचा काय आहे ही बचत योजना)

-याठिकाणी 'New Farmer Registration' या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका

-कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल

-तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील विचारला जाईल

-ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 16, 2021, 2:38 PM IST

ताज्या बातम्या