या महिन्यात तुमच्या LPG गॅसवर किती मिळेल सबसिडी? अशाप्रकारे घरबसल्या तपासा

या महिन्यात तुमच्या LPG गॅसवर किती मिळेल सबसिडी? अशाप्रकारे घरबसल्या तपासा

सामान्यांसाठी केंद्र सरकारडून देण्यात येणारी LPG गॅस सबसिडी प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी आहे. दरम्यान ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी ही सुविधा मिळत नाही

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी: सामान्यांसाठी केंद्र सरकारडून देण्यात येणारी LPG गॅस सबसिडी (Subsidy on LPG gas cylinder) प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी आहे. दरम्यान ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी ही सुविधा मिळत नाही. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला सबसिडी मिळणार आहे की नाही हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता. वाचा कशाप्रकारे तपासाल-

अशाप्रकारे तपासा इंडेन गॅसचे ऑनलाइन स्टेटस

-तुम्हाला सर्वात आधी इंडेनची अधिकृत वेबसाइट  https://bit.ly/3rU6Lol वर जावे लागेल

-याठिकाणी सिलेंडरचा एक फोटो असेल, त्यावर क्लिक केल्यावर कंप्लेंट बॉक्स दिसेल. त्यामध्ये Subsidy Status लिहून proceed वर क्लिक करावे लागेल

-आता तुम्हाला Subsidy Related (PAHAL) यावर क्लिक करायचे आहे. त्याठिकाणी असणाऱ्या Sub Category काही नवीन पर्याय दिसतील. त्याठिकाणी Subsidy Not Received वर क्लिक करावे लागेल.

-त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक प्रविष्ट करायचा आहे

(हे वाचा-PM Kisan योजनेच्या यादीत नाव येण्यासाठी करा हे काम, अन्यथा मिळणार नाहीत पैसे)

-मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड नसेल तर आयडीचा एक पर्याय आहे. त्याठिकामी तुम्हाला गॅस कनेक्शन आयडी द्यावा लागेल

-यानंतर व्हेरिफाय करून सबमिट करा

मिळेल सबसिडीबाबत पूर्ण माहिती

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या समोर सबसिडीची पूर्ण माहिती येईल. किती सबसिडी तुम्हाला मिळाली आहे आणि किती पाठवण्यात येणार आहे. याशिवाय तुम्ही कस्टमर केअरशी संपर्क साधून सबसिडी संदर्भात माहिती मिळवू शकता. इंडेन कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक 1800-233-3555 आहे. याठिकाणी देखील तुम्हाला कस्टमर केअर आयडी विचारला जाईल

(हे वाचा-Gold Price: सोनेखरेदी आधी इथे तपासा नवे भाव, आतापर्यंत 8800 रुपयांनी कमी झाले दर)

फेब्रुवारीमध्ये दोन वेळा महागला गॅस सिलेंडर

फेब्रुवारी महिन्यात दोन वेळा गॅस सिलेंडरचे दाम वाढले आहेत. सुरुवातीला 4 फेब्रुवारी रोजी मेट्रो शहरात इंडेन, एचपीने सबसिडी नसणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली होती. ही वाढ प्रति सिलेंडर 25 रुपये होती. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपये प्रति सिलेंडर वाढ करण्यात आली होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: February 17, 2021, 8:02 AM IST

ताज्या बातम्या