जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Property : कुटुंबातील दुसऱ्या कोणाच्या नावार प्रॉपर्टी करायचीये? ही आहे प्रोसेस, होणार नाही कोणताच वाद

Property : कुटुंबातील दुसऱ्या कोणाच्या नावार प्रॉपर्टी करायचीये? ही आहे प्रोसेस, होणार नाही कोणताच वाद

प्रॉपर्टी न्यूज

प्रॉपर्टी न्यूज

तुम्हीही तुमची प्रॉपर्टी मुलांच्या नावावर ट्रान्सफर करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला याच्या पध्दती माहिती असायला हव्यात. कोणत्याही वादाशिवाय प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 जुलै : म्हातारपणी सर्वच आई-वडील आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून निर्माण केलेली प्रॉपर्टी आपल्या मुलांच्या नावे करतात. पण अनेकदा असं पाहिलं जातं की, ज्यावेळी आई-वडील प्रॉपर्टीच्या वाटण्या करतात तेव्हा मुलांमध्ये वाद होतात. असा वेळी अनेक पद्धतींच्या मदतीने तुम्ही या वादापासून बचाव करु शकता. पण यासाठी तुम्हाला योग्य पध्दती माहिती असायला हव्यात. तुम्हीही तुमची मालमत्ता तुमच्या मुलांच्या किंवा कुटुंबातील इतर कोणाच्या नावावर ट्रान्सफर करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचे मार्ग सांगत आहोत. या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही कोणत्याही वादविना तुमची प्रॉपर्टी तुमच्या मुलांना ट्रन्सफर करू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

नॉमिनेशनच्या माध्यमातून प्रॉपर्टी ट्रान्सफर नॉमिनेशनद्वारे पालक त्यांच्या मुलांमध्ये प्रॉपर्टी विभागू शकतात. अशा प्रकारे, तुम्ही तुमची मालमत्ता सर्व मुलांमध्ये समान रीतीने वितरित करू शकता. नॉमिनेशनच्या माध्यमातून आई-वडील आपली प्रॉपर्टी ट्रान्सफर करु शकतात. यासोबतच त्यांना आपला नॉमिनेशन बदलायचा असेल तर ते आणखी एखादं नावही रजिस्टर करु शकता. अशा प्रकारे प्रॉपर्टी ट्रान्सफरवर वाद उत्पन्न होण्याची शक्यता खूपच कमी राहते. Real Estate Auction: ‘ही’ सरकारी बँक देतेय कमी पैशात घर आणि दुकान खरेदीची संधी! असा करा अर्ज मृत्यूप्रमाणपत्रा द्वारे करा वाटणी आई-वडील आपली प्रॉपर्टी मुलांमध्ये वाटण्यासाठी मृत्यूप्रमाणपत्र देखील बनवू शकता. मृत्युपत्रात त्यांना या मालमत्तेचा हिस्सा कोणाला द्यायचा आहे, हे सांगण्याची सुविधाही मिळते. भारतीय उत्तराधिकार कायदा, 1925 नुसार, मृत्युपत्र हा कायदेशीररित्या वैध दस्तऐवज आहे. ज्यांच्याकडे जास्त मालमत्ता आहे, ते त्यांचे मृत्यूपत्र आधीच ठेवतात. यामुळे मालमत्तेच्या मालकाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या इच्छेनुसार केवळ पात्र व्यक्तीलाच त्याच्या मालमत्तेवर हक्क मिळतो. Service Tax : प्रॉपर्टीवरही लागू शकतो सर्व्हिस टॅक्स, पाहा कधी द्यावा लागतो आणि दर किती? प्रॉपर्टीचे वैध डॉक्यूमेंट असणे आवश्यक कोणत्याही वाद आणि त्रासाशिवाय मालमत्ता ट्रान्सफर करण्यासाठी, तुमच्याकडे संबंधित मालमत्तेची संपूर्ण कागदपत्रे असणे सर्वात महत्त्वाचे आहे. कागदपत्र असल्‍याने तुम्‍हाला कोणताही वाद टाळण्‍यात मदत होते. यासोबतच तुमची एकूण संपत्ती किती आहे हे कागदपत्राद्वारे तपासणेही सोपे आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची मालमत्ता मुलांच्या नावावर ट्रान्सफर करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात