नवी दिल्ली, 16 जुलै : आपल्या देशात जास्तीत जास्त लोक दीर्घ कालावधीच्या सुरक्षित गुंतवणुकीसाठी नेहमी प्रॉपर्टीमध्ये पैसा गुंतवण्याला प्राधान्य देतात. सामान्यतः असं पाहिलं जातं की, प्रत्येक जण घर, दुकान किंवा प्लॉट आदी खरेदी करण्याच्या प्रयत्नात असतात. अशा वेळी कुठून स्वस्त प्रॉपर्टी खरेदीसाठी ऑफर मिळाली तर कोण ही संधी सोडेल? तुम्हालाही सध्या स्वस्तात घर किंवा दुकान खरेदी करायची असेल तर पंजाब नॅशनल बँक तुम्हाला एक शानदार संधी देत आहे.
खरं तर, पंजाब नॅशनल बँक अशा हजारो मालमत्तांचा लिलाव करणार आहे. ज्यांच्या मालकांनी बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर त्यांची परतफेड केली नाही. तुम्ही या लिलावात सहभागी होऊन स्वस्त प्रॉपर्टी खरेदी करु शकता. जाणून घेऊया ही प्रॉपर्टी कशी खरेदी करावी. ऑनलाइन होईल प्रॉपर्टीची निलामी पंजाब नॅशनल बँक लोनची रिकव्हरी करण्यासाठी 11,374 घर आणि 2,155 दुकानांचा लिलाव करणार आहे. या लिलावाची पूर्ण प्रोसेस ऑनलाइन होईल. या लिलावाची संपूर्ण प्रक्रिया केवळ ऑनलाइन असेल. याद्वारे बँकेला दीर्घकाळापासून थकीत कर्जाची रक्कम वसूल करण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर लोकांना स्वस्तात मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल. हा लिलाव 20 जुलै 2023 रोजी होणार आहे, एक टप्पा 6 जुलै रोजी पूर्ण झाला आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही या ई-लिलावात स्वस्तात घर किंवा दुकान खरेदी करू शकता. SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! थेट खिशावर होणार परिणाम या प्रॉपर्टीचा ई-लिलावात समावेश केला जाईल पीएनबीने केलेल्या ट्विटनुसार, बँक एनपीए झालेल्या संपत्तीचा लिलाव करणार आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेकडून 11,374 घरे आणि 2,155 दुकाने तसेच 1,113 औद्योगिक क्षेत्रातील आस्थापने, 98 शेतजमीन आणि 45 इतर मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. त्याच वेळी, पुढील 30 दिवसांत, बँक पुन्हा 1,701 घरे, 365 दुकाने आणि 177 औद्योगिक मालमत्तांचा लिलाव करणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही बँकेच्या www.ibapi.in या वेबसाइटवर भेट देऊ शकता. SBI मध्ये अकाउंट नाही, तरीही YONO अॅपद्वारे करु शकता UPI पेमेंट, पाहा प्रोसेस! ई-नीलामीवरुन अशी खरेदी करा प्रॉपर्टी पंजाब नॅशनल बँकेच्या या ई-लिलावात सहभागी होण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी बँकेच्या https://ibapi.in/ वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला पेजवर ई-लिलाव प्रॉपर्टीचे डिटेल्स दिसतील. नोटीसमध्ये दिलेल्या मालमत्तेची रक्कम जमा केल्यानंतर, तुम्हाला केवायसी डॉक्यूमेंट संबंधित शाखेत जमा करावी लागतील. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी डिजिटल सिग्नेचर खूप महत्त्वाची आहे. येथे रजिस्टर केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ई-मेल आयडीवर पुढील लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल. याद्वारे तुम्ही ई-लिलावात सहभागी होऊ शकाल.