Tallest Building in India: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफा आहे. अनेक लोकांना ही गोष्ट माहिती आहे. पण देशातील सर्वात उंच रहिवासी इमारत कोणती आहे आणि किती उंच आहे तुम्हाला माहितीये का? खूप कमी लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल. कारण ही इमारत 2007 पासूनच तयार होत आहे पण अद्यापही पूर्ण झालेली नाही. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे या इमारतीच्या निर्मितीमध्ये अडचणी येत आहेत. त्याची पायाभूत सुविधा आणि मजले पूर्णपणे तयार आहेत. परंतु त्यानंतरही फिनिशिंगचे काम सुरू आहे. ही इमारत पॅलेस रॉयल आहे. मुंबईतील वरळीमध्ये ही इमारत आहे.
ही वास्तू वेळोवेळी चर्चेत येत असते. त्याच्या बांधकामाची कहाणी खूप मनोरंजक आणि दुःखद दोन्ही आहे. या इमारतीचे बांधकाम 2007 मध्ये सुरू झाले. या प्रकल्पाची पायाभरणी करणारी व्यक्ती म्हणजे विकास कासलीवाल. ते रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत आणि यापूर्वी श्रीराम अर्बन इन्फ्रा चे प्रमोटर देखील आहेत. गेल्या वर्षी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र पुन्हा चर्चेत येण्याचे कारण बनले होते. केले होते धक्कादायक आरोप या इमारतीच्या बांधकामात 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप कासलीवाल यांनी केला होता. कासलीवाल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या इमारतीच्या बांधकामात राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महसुलाचे नुकसान झाले आहे. मात्र, या आरोपाचे पुढे काय झाले, याची कोणालाच खबर नाही. Property Rule : रेंट अॅग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन कसं करायचं? ही आहे ऑनलाइन प्रोसेस इमारतीवर ग्रहण इमारतीचा वरचा मजला 2012 मध्ये पूर्ण झाला. त्याचे काम सुरू झाल्यानंतर 5 वर्षांनी हा मजला पूर्ण झाला. पण, ही इमारत हातातून निसटणार आहे, हे बिल्डर्सला माहिती होती. त्याच वर्षी इमारतीच्या विरोधात अनेक जनहित याचिका दाखल झाल्या. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि त्याच्या बांधकामावर बंदी घालण्यात आली. प्रकरण पुढे सरकले आणि प्रोजेक्टचा खर्च दिवसेंदिवस वाढत गेला. एक वेळ अशी आली की या प्रोजेक्टची प्रमोटर श्रीराम अर्बन इन्फ्रा स्वतःच दिवाळखोरीत निघाले. कंपनीने इंडियाबुल्सकडून कर्ज घेतले होते, त्यामुळे इंडियाबुल्सने प्रकल्पाचा लिलाव केला आणि नवीन प्रमोटर ऑनेस्ट शेल्टर प्रायव्हेट लिमिटेड बनले. हा प्रकल्प 2022 च्या अखेरीस पूर्ण व्हायचा होता परंतु तो अद्याप झालेला नाही. ही इमारत बनवण्यासाठी सुमारे 3000 कोटी रुपये खर्च झाले आहेत. High Speed Train: दिल्ली ते मुंबई फक्त 3 तासात! भारतात ही ट्रेन सुरु झाली तर कोणीच पकडणार नाही फ्लाइट सर्वात स्वस्त फ्लॅट 40 कोटींचा या इमारतीत एकूण 72 मजले आहेत. ही प्रीमियम रेजिडेंशियल इमारत आहे. कारण ही भारतातील सर्वात उंच निवासी इमारत आहे. इथल्या फ्लॅटची किंमत त्यानुसार आहे. 2013 मध्ये या इमारतीतील फ्लॅटची बुकिंग किंमत 27 कोटी रुपये होती. आज येथील सर्वात स्वस्त फ्लॅटची किंमत 40 कोटी रुपये आहे.