नवी दिल्ली, 29 जून : प्रॉपर्टी भाड्याने देण्याचं प्रमाण वेगाने वाढतंय. मोठ्या शहरांपासून तर छोट्या शहरांमध्येही घर-फ्लॅट भाड्याने देण्याचे प्रमाण वाढलंय. घर भाड्याने दिल्याने इन्कमसोबतच तुमच्या घराची देखरेखही होते. घर भाड्याने देण्यापूर्वी नेहमीच रेंट अॅग्रीमेंट करुन घेतलं जातं. रेंट अॅग्रीमेंटवरुन कळतं की, दोन्ही पक्षांमध्ये आपसात कोणते नियम आणि अटींवर सहमती झाली आहे. काही भांडण झाल्यास हे पुरावा म्हणून कामी येतं.
रेंटल अॅग्रीमेंट हा प्रॉपर्टीचा मालक आणि भाडेकरू यांच्यात स्वाक्षरी केलेला कॉन्ट्रेक्ट आहे जो विशिष्ट कालावधीसाठी रेसीडेंशियल परिसरात राहण्याचा अधिकार देतो. रेंट अॅग्रीमेंट रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून दोन्ही पक्षांद्वारे हे महत्त्वाचे डॉक्यूमेंट आहे. ते विवादांच्या बाबतीत कायदेशीर पुरावा म्हणून कार्य करते. तुम्ही भाडे करार नोंदणी केल्यास याचे अनेक फायदे आहेत. रेंड अॅग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे का? घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद झपाट्याने वाढत असताना, रेंट/लीज अॅग्रीमेंट ड्राफ्ट करुन जवळच्या सब-रजिस्ट्रार कार्यालयात रजिस्टर करणे आवश्यक आहे. रेंटल अॅग्रीमेंटला रजिस्टर केल्याने कायदेशीररित्या भविष्याच्या वादांविषयी दोन्हीही पार्टींच्या अधिकारांचे संरक्षण होते. रेंट अॅगीमेंटचं रजिस्ट्रेशन न करण्याचे दुष्परिणाम रेंट अॅग्रीमेंट रजिस्टर्ड नसेल. तर केंद्र सरकारच्या तसेच विविध राज्य सरकारांच्या भाडे नियंत्रण कायद्यातील तरतुदी लागू होत नाहीत. भाडेकरूला प्रॉपर्टी 11 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी द्यायची असल्यास, सर्व प्रॉपर्टीजला रजिस्टर करावं लागेल. 11 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या अॅग्रीमेंटमध्ये रजिस्ट्रेशनमध्ये आवश्यक नाही. Photos: भारतीय कुटुंबाने स्वित्झर्लंडमध्ये खरेदी केलं महागडं घर, किंमत पाहून व्हाल अवाक् काही शहरे/राज्ये अशा कागदपत्रांच्या ऑनलाइन नोंदणीची सुविधा देतात. भाडे करार स्टॅम्प पेपरवर छापलेला असावा किंवा पहिल्या पानावर ई-स्टॅम्प चिकटवावा. महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये भाडे कराराची ऑनलाइन नोंदणी शक्य आहे. यासाठी लोकांना/जमीनमालकांना ई-फायलिंग वेबसाइटला (https://efilingigr.maharashtra.gov.in/ereg/) भेट देऊन प्रोफाइल तयार करावे लागेल. प्रोफाइल तयार केल्यानंतर, यूझर्सला गाव, तालुका, मालमत्तेचा प्रकार, परिसर, पत्ता आणि इतर उपलब्ध माहिती यांसारख्या मालमत्तेचे डिटेल्स भरावे लागतील. Rule Change: गॅस सिलेंडरपासून क्रेडिट कार्डपर्यंत जुलैपासून बदलणार ‘हे’ नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम! रेंट अॅग्रीमेंट कसं रजिस्टर करावं सिक्योरिटी डिपॉझिट, भाडे आणि देखभाल यासंबंधी महत्त्वाच्या कलमांसह भाडे कराराचा मसुदा तयार करा. रजिस्ट्रेशनसाठी, प्रॉपर्टीचे मालक आणि भाडेकरू दोघांनीही दोन साक्षीदारांसह सब रजिस्ट्रार कार्यालयात फिजिकली उपस्थित राहणे आवश्यक आहे. एजंटद्वारे रेंट अॅग्रीमेंटची नोंदणी करण्याची परवानगी नाही.