मुंबई, 27 ऑक्टोबर: सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या यूनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank of India Loan Offer) ग्राहकांना सणासुदीच्या काळात मोठं गिफ्ट दिलं आहे. फेस्टिव्हल काळात धमाकेदार लोन ऑफरची (Union Bank Loan) घोषणा केली आहे. यूनियन बँक ऑफ इंडियाने कर्जावरील व्याजदरात 0.40 टक्क्यांची कपात केली आहे. यूनियन बँक ऑफ इंडियाने 6.40% ने सुरू होणारा कमीतकमी व्याजदर देण्याची तसेच गृहकर्जावरील व्याजदरात (Union Bank of India Home Loan Offer) कपात करण्याची घोषणा केली आहे. आधी हा दर 6.80% होता, त्यात कपात केल्यानंतर UBI मधील कमीत कमी व्याजदर 6.40% झाला आहे. होम लोनवर कमी करण्यात आलेले व्याजदर 27 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.
हे वाचा-भारतातील पहिला 'स्किल इम्पॅक्ट बॉण्ड' लॉन्च; 50 हजार तरुणांना होणार फायदा
कुणाला मिळणार फायदा?
नवीन दरे त्या ग्राहकांना लागू होणार आहेत जे नवीन कर्जासाठी अर्ज करणार आहेत किंवा जे बॅलन्स ट्रान्सफरसह चालू असणार कर्ज हस्तांतरित करणार आहेत. बँकेच्या मते या सणासुदीच्या काळात ग्राहकांना या ऑफरचा फायदा होईल. कारण या काळात घर खरेदीची मागणी वाढते, त्यामुळे होम लोनवरील व्याज कमी झाल्याने ग्राहकांना फायदाच होईल. मीडिया अहवालांनुसार यूनियन बँक ऑफ इंडियाचा हा गृहकर्जावरील व्याजदर सर्वात कमी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.