जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price: दिवाळीपर्यंत 50000 रुपयांवर पोहोचणार सोन्याचे दर, आता खरेदी कराल तर 8 दिवसांत किती मिळेल नफा?

Gold Price: दिवाळीपर्यंत 50000 रुपयांवर पोहोचणार सोन्याचे दर, आता खरेदी कराल तर 8 दिवसांत किती मिळेल नफा?

Gold Price: दिवाळीपर्यंत 50000 रुपयांवर पोहोचणार सोन्याचे दर, आता खरेदी कराल तर 8 दिवसांत किती मिळेल नफा?

Gold Rate Today: या आठवड्यातील किरकोळ चढउतारानंतर सोन्यात आता गुंतवणूक केल्यास तुम्हाला दिवाळीपर्यंत आठवडाभरात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचं मत?

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर: सणासुदीच्या काळात सातत्याने होत असलेल्या वाढीमध्ये सोन्याच्या किंमतीत (Gold Latest Rate) मंगळवारी किरकोळ घसरण झाली होती. 5 रुपये प्रति तोळाने सोन्याचे दर कमी झाले होते. यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 47,153 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर काल चांदीचे दरही (Silver Latest Rate) काल 287 रुपयांनी कमी होऊन 64,453 रुपये प्रति किलोवर बंद झाले होते. या किरकोळ चढउतारानंतर सोन्यात आता गुंतवणूक केल्यास तुम्हाला दिवाळीपर्यंत आठवडाभरात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचं मत? 50000 रुपयांवर पोहोचणार दर सोन्याच्या सध्याच्या किमती पाहता, आता सोन्यात गुंतवणूक करायची (Investment in Gold) की थांबवायची, असा प्रश्न गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्यांच्या मोठ्या वर्गासमोर आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही काळापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या खरेदीबाबत अशीच तीव्र भावना कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 50,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. अर्थात तुम्ही सध्याच्या किंमतीवर सोनं खरेदी केल्यास, तुम्ही प्रत्येक 10 ग्रॅमसाठी 2,500 रुपयांपेक्षा जास्त कमावू शकता. वाचा- Union Bank of India ची होम लोनवर धमाकेदार ऑफर, अतिशय कमी व्याजदरात मिळेल गृहकर्ज सोन्याच्या किंमतीत का होईल वाढ? डॉलरच्या कमजोरीमुळे अलीकडच्या काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय सणासुदीच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांकडून वाढलेल्या मागणीचा परिणामही सोन्याच्या किमतीवर दिसून येत आहे. भारतात कोरोना महामारीनंतर सोन्याच्या आयातीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्याचबरोबर स्पॉट मार्केटमध्येही सोन्याचे भाव वाढत आहेत. जागतिक ट्रेंडचा फायदाही सोन्याला मिळत आहे. शिवाय यूएस ट्रेजरी बाँड्सचे उत्पन्न वाढणे देखील सोन्याच्या किमतीला आधार देत आहे. त्याचप्रमाणे कच्च्या तेलाच्या किमतीचा देखील सपोर्ट सोन्याला मिळतो आहे. वाचा- एक-दोन नव्हे तर 7 आयपीओ येणार बाजारात! Policybazaar-Paytm सह मिळेल कमाईची संधी दीर्घकालीन सोन्याचा कल कसा असेल कोरोना मुळे पुरवठा साखळीतील बहुतेक वस्तुंमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. या यादीत सोनंही आहे. कॅनडाच्या गोल्ड कॉर्प इंक मध्ये काम केलेले डेव्हिड गारोफालो आणि रॉब मॅकवेन यांच्या मते, सोन्याच्या किमती लवकरच वाढू शकतात. सोन्याची किंमत प्रति औंस $3000 पर्यंत पोहोचू शकते, जी सध्या $1,800 च्या आसपास आहे. त्याच वेळी, मॅकक्वीन असेही म्हणतात की दीर्घकाळात सोने $ 5000 च्या पातळीवर पोहोचेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात