मुंबई, 8 नोव्हेंबर : शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार नेहमीच चांगल्या शेअरच्या शोधात असतात. आज अशाच एका शेअरबद्दल माहिती घेऊया ज्याने आज त्याचा ऑल टाईल हाय (All Time High) टच केला आहे. प्रिन्स पाईप्स आणि फिटिंग्ज लिमिटेड (Prince Pipes and Fittings Limited share) असं या शेअरचं नाव आहे. प्रिन्स पाईप्स आणि फिटिंग्ज लिमिटेडच्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात त्याच्या शेअर होल्डर्सना 250 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहे.
प्रिन्स पाईप्स आणि फिटिंग्ज लिमिटेड कंपनीच्या शेअरने सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 8.5 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. आज हा शेअर 842 रुपयांवर म्हणजेच ऑल टाईम हायवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात शेअरची किंमत 250.54 टक्क्यांनी वाढली आहे. वर्षभरापूर्वी 9 नोव्हेंबर 2020 रोजी हा शेअर 240.20 रुपयांवर होता जो आज 842 रुपयांवर पोहोचला आहे. मागील सहा महिन्यात शेअरने 46.93 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
आता EMI वरही काढता येणार विमानाचं तिकीट, Spicejet ची खास सुविधा
प्रिन्स पाईप्स आणि फिटिंग्ज लिमिटेड कंपनीची मार्केट कॅप 8975 कोटी रुपयांची आहे. शेअर समभाग 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग अॅवरेजपेक्षा जास्त ट्रेड करत आहेत. प्लॅस्टिक पाईप निर्मात्या कंपनीने सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत 76 कोटींचा नफा नोंदवला आहे. जो मागील वर्षीच्या तिमाहीत 46.5 कोटी होता. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ महसूल 66 टक्क्यांनी वाढून 761 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
विना Internet ही करता येईल UPI Payment, पाहा काय आहे सोपी पद्धत
प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्ज लिमिटेड (PPFL) स्टॉक कीपिंग युनिट्स (SKUs) आणि प्रमोटर्सच्या संख्येच्या बाबतीत भारतातील आघाडीच्या पॉलिमर पाईप आणि फिटिंग उत्पादकांपैकी एक आहे. प्रिन्स पाइपिंग सिस्टीम्स आणि ट्रूबोर या दोन ब्रँड नावांखाली ते आपल्या उत्पादनांची विक्री करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market