मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आता EMI वरही काढता येणार विमानाचं तिकीट, Spicejet ची खास सुविधा

आता EMI वरही काढता येणार विमानाचं तिकीट, Spicejet ची खास सुविधा

Spicejet कंपनीच्या विमानानं (Spicejet announces EMI for air tickets) प्रवास करणाऱ्यांना आता ईएमआय सुविधेचा लाभ घेता येणार आहे. अनेकदा प्रवाशांना विमानानं जाण्याची गरज असते.

Spicejet कंपनीच्या विमानानं (Spicejet announces EMI for air tickets) प्रवास करणाऱ्यांना आता ईएमआय सुविधेचा लाभ घेता येणार आहे. अनेकदा प्रवाशांना विमानानं जाण्याची गरज असते.

Spicejet कंपनीच्या विमानानं (Spicejet announces EMI for air tickets) प्रवास करणाऱ्यांना आता ईएमआय सुविधेचा लाभ घेता येणार आहे. अनेकदा प्रवाशांना विमानानं जाण्याची गरज असते.

    नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर: Spicejet कंपनीच्या विमानानं (Spicejet announces EMI for air tickets) प्रवास करणाऱ्यांना आता ईएमआय सुविधेचा लाभ घेता येणार आहे. अनेकदा प्रवाशांना विमानानं जाण्याची गरज असते. मात्र त्यावेळी तिकीटासाठी पुरेसे पैसे (New facility for air travellers) नसल्यामुळे इतर मार्गांनी प्रवास करावा लागतो. हे टाळण्यासाठी कंपनीकडून ईएमआयची सुविधा सुरु करण्यात आली आहे. तीन, सहा आणि बारा महिन्यांचे ईएमआय उपलब्ध करून देण्यात येणार असून तीन महिन्यांपर्यंतच्या (Interest free scheme for 3 months) ईएमआयची सुविधा ही बिनव्याजी असेल, असं सांगण्यात आलं आहे. अशी होईल अंमलबजावणी तुम्हाला हफ्त्यांवर ईएमआयचं तिकीट काढायचं असेल, तर लॉगइन करताना काही मुलभूत तपशील कंपनीला पुरवावे लागतील. यामध्ये तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि व्हीआयडी यांचा समावेश असणार आहे. ग्राहकांना पहिला ईएमआय तिकीट काढतानाच भरावा लागेल, तर पुढील महिन्यापासून ठरलेले हफ्ते सुरू होणार आहेत. पहिला हफ्ता युपीआय वापरून भरता येईल. म्हणजेच पहिला हफ्ता हा तुम्ही तुमचं डेबिट किंवा क्रेडीट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग वापरून भरू शकता. या योजनेसाठी तुमच्या क्रेडीट किंवा डेबिट कार्डचे कुठलेही इतर तपशील देण्याची गरज भासणार नाही, असंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपनीकडून नवी उड्डाणं स्पाईसजेट कंपनीनं खास हिवाळ्यासाठी नव्या उड्डाणांची घोषणा केली आहे. 31 ऑक्टोबरपासून 28 नवी उड्डाणं सुरू होणार असून देशातील प्रमुख महानगरांसह जयपूर, जैसलमेर,जोधपूर आणि उदयपूर यासारख्या पर्यटनस्थळांचाही त्यात समावेश असणार आहे. जयपूर, कोलकाता, मुंबई आणि बंगळुरू या शहरांना जोडणारी अनेक उड्डाणं स्पाईसजेटकडून नियोजित करण्यात आली आहेत. याशिवाय बागडोगरा ते अहमदाबाद, कोलकाता ते श्रीनगर विमानसेवाही सुरू होणार आहे. पुणे ते बंगळुरू या मार्गावर दोन विमानफेऱ्या वाढवण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. हे वाचा- विना Internet ही करता येईल UPI Payment, पाहा काय आहे सोपी पद्धत असं बुक करा तिकीट तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला spicejet.com या वेबसाईटवर जावं लागेल. कंपनीचं ऍप डाऊनलोड करून त्यावरूनही तुम्ही तिकीट बुक करू शकता. अनेक ट्रॅव्हल एजन्सीज सध्या विमानाच्या तिकीटावर आकर्षक ऑफरही देत आहेत, ज्यांचा लाभ तुम्हाला घेता येईल
    Published by:desk news
    First published:

    Tags: Airplane, Loan, Sale offers

    पुढील बातम्या