मराठी बातम्या /बातम्या /मनी /या शेअरने दिला 240 टक्क्यांपेक्षा अधिक बंपर रिटर्न! ₹1,091 वर पोहचू शकतो स्टॉक

या शेअरने दिला 240 टक्क्यांपेक्षा अधिक बंपर रिटर्न! ₹1,091 वर पोहचू शकतो स्टॉक

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

प्रिन्स पाइप्स अँड फिटिंग्स लिमिटेड (Prince Pipes and Fittings Limited Share Price) च्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 240 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) हा स्टॉक 8.5 टक्क्यांनी वाढून 824.95 रुपयांच्या ऑल टाइम हायवर पोहोचला आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर: प्रिन्स पाइप्स अँड फिटिंग्स लिमिटेड (Prince Pipes and Fittings Limited Share Price) च्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 240 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) हा स्टॉक 8.5 टक्क्यांनी वाढून 824.95 रुपयांच्या ऑल टाइम हायवर पोहोचला आहे. गेल्या एका वर्षात शेअरची किंमत 240 रुपयांवरून 824.95 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना सुमारे 243 टक्के परतावा मिळाला आहे.

या वर्षी आतापर्यंत शेअर्स 173 टक्क्यांनी वाढले

या वर्षाच्या सुरुवातीपासून या कंपनीचा स्टॉक सुमारे 173 टक्क्यांनी वाढला आहे. 8,975 कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह, शेअर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या चलन सरासरीपेक्षा जास्त व्यापार करत आहेत. प्लॅस्टिक पाईप निर्माता कंपनीने सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत रु. 76 कोटींचा स्वतंत्र नफा नोंदवला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत रु. 46.5 कोटी होता. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ महसूल 66 टक्क्यांनी वाढून 761 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

हे वाचा-खूशखबर! Bank of Baroda विकतेय स्वस्त प्रॉपर्टी, वाचा कधी होणार मेगा ई-लिलाव?

येस सिक्योरिटीज (YES Securities reckons) च्या मते, कंपनीने आर्थिक वर्ष 2016 पासून एकूण कर्ज 275 कोटींवरुन कमी करून आर्थिक वर्ष 2021 मध्ये 80 कोटी केले आहेत. यामुळे कंपनीची बॅलन्स शीट मजबूत झाली आहे. आजपर्यंत, कंपनी दीर्घकालीन कर्जापासून मुक्त आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रति शेअर रु 1,091 च्या लक्ष्य किंमतीसह या स्टॉकवर 'खरेदी' रेटिंग आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्ज लिमिटेडचे ​​संपूर्ण भारतात मजबूत अस्तित्व आहे. शिवाय या कंपनीची उत्पादन सुविधा उत्तरेकडे सर्वाधिक आहे (क्षमतेच्या 42 टक्के); पश्चिमेकडे ही सुविधा एकूण क्षमतेच्या 35 टक्के आणि दक्षिण भारतात एकूण क्षमतेच्या 23 टक्के आहे. कंपनीचे उत्तर आणि पश्चिम भारतात “प्रिन्स” या ब्रँडद्वारे मजबूत स्थान आहे, तर दक्षिण भारतात ती “ट्रुबोर” या ब्रँडद्वारे काम करते.

First published:
top videos

    Tags: Money, Share market