नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर: जर तुम्ही स्वत:चं घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याच महिन्यात बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda E-auction) तुम्हाला संधी देत आहे. या खास ऑफर अंतर्गत तुम्ही स्वस्तात घर खरेदी (Residential Property) करू शकता. बँक ऑफ बडोदा प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी हा ई-लिलाव असणार आहे. बँकेकडून डिफॉल्ट प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो.
IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) कडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. शिवाय बँकेने ट्वीट करत या लिलावाबाबत सांगितले आहे. बँक ऑफ बडोदाकडून रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, अॅग्रीकल्चर प्रॉपर्टी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. बँक ऑफ बडोदाकडून अशा प्रॉपर्टींचा लिलाव केला जाणार आहे, ज्या डिफॉल्टच्या यादीमध्ये आल्या आहेत.
हे वाचा-वर्षभरात 250 टक्के रिटर्न देणारा स्टॉक आज All time high वर, तुमच्याकडे आहे का?
केव्हा आहे लिलाव?
बँक ऑफ बडोदाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत अशी माहिती दिली आहे की, 16 नोव्हेंबर रोजी हा मेगा ई-लिलाव होणार आहे. तुमच्या आवडीची प्रॉपर्टी खरेदी करण्याची ही संधी असल्याचं ट्वीट बँकेने केलं आहे. या लिलावात तुम्हाला देशभरातील विविध प्रॉपर्टी खरेदी करता येणार आहेत.
This festive season, buy a property of your choice. #BankofBaroda presents Mega e-Auction on 16th November 2021, where you can get a property of your choice with ease. Know more https://t.co/ejge3HVBe0 #azadikaamritmahotsav #amritmahotsav pic.twitter.com/kvgLwZsgoo
— Bank of Baroda (@bankofbaroda) November 7, 2021
कुठे कराल रजिस्ट्रेशन?
बँक ऑफ बडोदाच्या मेगा ई-ऑक्शनमध्ये इच्छूक बिडरला e Bkray पोर्टल https://ibapi.in/ वर रजिस्ट्रेशन करावं लागेल. बिडर्स रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर बिडरला आपल्या मोबाईल नंबर आणि Email ID चा वापर करुन E-Auction प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावं लागेल.
KYC डॉक्यूमेंट्सची आवश्यकता
बिडरला KYC डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. KYC डॉक्युमेंट E-Auction सर्विस प्रोवाइडर द्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल. यासाठी कमीत-कमी दोन वर्किंग डे इतका वेळ लागू शकतो.
हे वाचा-'या' शेअरमध्ये गुंतवलेले पैसे सहा महिन्यात दुप्पट; तेजी कायम राहण्याचा दावा
अधिक माहितीसाठी...
तुम्हाला या लिलावाबाबत अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही https://ibapi.in/https://www.bankofbaroda.in/e auction.htm?utm_source=SM&utm_medium=Post&utm_campaign=MegaAuction_km लिंकवर भेट देऊ शकता.
या मालमत्तांचा होतो लिलाव
ज्या प्रापर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते. बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. अशाप्रकारच्या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल करुन घेतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.