ATM कार्ड विसरलात? चिंता नको, तरीही तुम्ही 'असे' काढू शकता पैसे

ATM - तुम्ही डेबिट कार्ड विसरलात तरीही atm मधून पैसे काढू शकता. कसे ते पाहा

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2019 06:49 PM IST

ATM कार्ड विसरलात? चिंता नको, तरीही तुम्ही 'असे' काढू शकता पैसे

मुंबई, 11 सप्टेंबर : आता एटीएम कार्डाशिवाय पैसे काढणं सोपं झालंय. SBI नंतर आणखी एक सरकारी बँक बँक ऑफ इंडियानं ही सुविधा सुरू केलीय. बँक ऑफ इंडियाचे ग्राहक QR कोड स्कॅन करून ATM मधून पैसे काढू शकतात. म्हणून बँकेनं एटीएममध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)द्वारे क्युआर कोडचं नवं फीचर जोडलंय. ही सुविधा मुंबई, दिल्ली आणि चेन्नई इथे सुरू केलीय. पुढच्या सहा महिन्यात अख्ख्या देशात ही योजना सुरू केली जाईल.

AGS Transact Technologies या तंत्राद्वारे ही सेवा सुरू केलीय. बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना फ्राॅडपासून वाचवण्यासाठी ही सेवा सुरू केलीय. बँक ऑफ इंडियाप्रमाणे SBI ही सेवा देतंय.

सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, 'हे' आहेत बुधवारचे दर

कशी असते पैसे काढण्याची पद्धत?

1. पैसे काढण्यासाठी कार्ड आणि पिनची गरज नाही. तुम्ही जास्तीत जास्त 2 हजार रुपये काढू शकता. SBI च्या या सेवेचं नाव YONO Cash आहे.

Loading...

2. योनो डिजिटल प्लॅटफाॅर्म 85 ई काॅमर्स कंपन्यांना सेवा देतं.

3. SBI नं हे 2017मध्ये लाँच केलं होतं. फेब्रुवारी 2019पर्यंत YONO APP 1.8 कोटी लोकांनी डाऊनलोड केलं. 70 लाख अॅक्टिव युजर्स आहेत.

'हा' व्यवसाय सुरू करणाऱ्यांना सरकार देईल अर्ध्यापेक्षा जास्त पैसे

4.YONO APP मध्ये पैसे काढण्यासाठी 6 डिजिट पिन सेट करायला हवा.

5. या ट्रॅन्झॅक्शनसाठी मोबाइलवर SMS द्वारे 6 डिजिट रेफरन्स नंबर मिळेल. त्यानंतर 30 मिनिटांच्या आत ATMमध्ये जाऊन तुम्ही पैसे काढू शकता.

SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! 1 ऑक्टोबरपासून मोफत होतील बँकेच्या 'या' सेवा

6. तिथे गेल्यावर तुम्ही 6 डिजिटचा पिन आणि रेफरन्स नंबर टाका. तुमच्या हातात पैसे येतील. SBIनं सांगितलं की डेबिट कार्डामुळे होणारे फ्राॅड होणार नाहीत.

उद्धव ठाकरेंचं युतीबद्दल सूचक विधान, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ATM
First Published: Sep 11, 2019 06:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...