मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI चा कोट्यवधी प्रीपेड मोबाईल ग्राहकांना दिलासा! जाणून घ्या ऑगस्ट महिन्यापासून रिचार्जमध्ये काय होणार बदल

RBI चा कोट्यवधी प्रीपेड मोबाईल ग्राहकांना दिलासा! जाणून घ्या ऑगस्ट महिन्यापासून रिचार्जमध्ये काय होणार बदल

भारतीय रिझर्व बँकेने (RBI) भारत बिल पेमेंट सिस्टमची (Bharat Bill Payment System) व्याप्ती वाढवली आहे. त्यामुळे प्रीपेड मोबाइल रिचार्ज करणाऱ्यांची सोय होणार आहे.

भारतीय रिझर्व बँकेने (RBI) भारत बिल पेमेंट सिस्टमची (Bharat Bill Payment System) व्याप्ती वाढवली आहे. त्यामुळे प्रीपेड मोबाइल रिचार्ज करणाऱ्यांची सोय होणार आहे.

भारतीय रिझर्व बँकेने (RBI) भारत बिल पेमेंट सिस्टमची (Bharat Bill Payment System) व्याप्ती वाढवली आहे. त्यामुळे प्रीपेड मोबाइल रिचार्ज करणाऱ्यांची सोय होणार आहे.

नवी दिल्ली, 15 जून:  तुम्ही जर प्रीपेड फोन वापरणारे युजर असाल तर तुमच्यासाठी महlत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व बँकेने (RBI) भारत बिल पेमेंट सिस्टमची (Bharat Bill Payment System) व्याप्ती वाढवली असून त्यामध्ये बिलरच्या रुपात 'मोबाइल प्रीपेड रिचार्ज'ची (Mobile prepaid recharge) सुविधा दिली जाणार आहे. यामुळे देशातील प्रीपेड फोन सेवेच्या कोट्यवधी युझर्सला मदत मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 2019मध्ये बीबीपीएसची व्याप्ती वाढवत त्यामध्ये दरमहा बिल पाठवणाऱ्या (मोबाईल प्रीपेड रिचार्ज वगळता) सर्व प्रकारच्या श्रेणी बिलर्सना (बिल पाठवणारी कंपनी) ऐच्छिक तत्वावर पात्र सहभागी म्हणून समाविष्ट केलं गेलं आहे.

याआधीचे नियम काय होते?

याआधी बीबीपीएसच्या माध्यमातून दरमहा किंवा ठराविक काळानंतर तयार होणारी बिलं देय सुविधा केवळ पाच विभागांमध्ये उपलब्ध होती. त्यामध्ये डायरेक्ट टू होम (DTH), विज, गॅस, दूरसंचार आणि पाण्याचा समावेश आहे. रिझर्व बँकेने एका सर्क्युलरमध्ये म्हटलंय की, 'वेगवेगळ्या बिलर प्रकारात नियमित वाढ होत असल्याने आणि मोबाइल प्रीपेड ग्राहकांना रिचार्जसाठी अधिक पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी बीबीपीएसने बिलर (BBPS Biller) प्रकारात ऐच्छिक तत्त्वावर 'मोबाइल प्रीपेड रिचार्ज' देण्याचे ठरविले आहे.'

हे ही वाचा:HDFC बँकेचं मोबाईल अ‍ॅप ठप्प! तुम्हीही ग्राहक असाल तर काय कराल, वाचा इथे

प्रीपेड फोन सेवेते 110 कोटी यूझर्स

भारतात 2020च्या डिसेंबर महिन्यात प्रीपेड फोन सेवेचे 110 कोटी य़ुझर्स होते. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की 31 ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी याची अंमलबजावणी केली जाईल. बीबीपीएस ही बिल देय देण्याची एक एकीकृत प्रणाली आहे जी ग्राहकांना ऑनलाइन इंटरऑपरेबल बिल पेमेंट सेवा (Online Interoperable Bill Payment Service) तसेच एजंट्सच्या नेटवर्कद्वारे ऑफलाइन देखील ही सुविधा प्रदान करते. म्हणजे आपल्या रोजच्या वापरातील सेवांची मासिक बिलं आपण या प्रणालीचा वापर करून भरू शकतो. जसं वीज बिल, पाणी बिल. बीबीपीएस नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) अंतर्गत काम करते.

भारतात प्रीपेड फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रिझर्व बँकेच्या या निर्णयाचा युझर्सला फायदा होईल. तसेच या निर्णयामुळे ट्रॅन्झॅक्शन (Fast Transactions) लवकर होईल आणि वेळही वाचेल. शिवाय भारत बिल पेमेंटचा (Bharat Bill Payment System) पर्याय उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील युजरना दिलासा मिळेल कारण या यंत्रणेमुळे अडथळे कमी होतील. आता ग्राहक एखाद्या अपवरून नेहमीची बिलं भरत असतील तर आरबीआयच्या नव्या नियमामुळे त्यांना त्याच अपवरून प्रीपेड मोबाईलमध्ये पैसे भरणं शक्य होणार आहे.

First published:

Tags: Prepaid, Rbi, Rbi latest news, Recharge