मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

HDFC बँकेचं मोबाईल अ‍ॅप ठप्प! तुम्हीही ग्राहक असाल तर काय कराल, वाचा इथे

HDFC बँकेचं मोबाईल अ‍ॅप ठप्प! तुम्हीही ग्राहक असाल तर काय कराल, वाचा इथे

मंगळवार सकाळपासूनच एचडीएफसी बँकिंग अ‍ॅप सुरू नाही. सर्विस आउटेजमुळे युजर्स HDFC Mobile Banking App मध्ये लॉगइन करू शकत नाहीत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 15 जून: जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल आणि सर्व ट्रान्झेक्शनसाठी मोबाईल बँकिंग अ‍ॅपचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. HDFC Mobile Banking App सध्या डाउन असून युजर्सला ट्रान्झेक्शन पूर्ण करण्यासाठी अनेक समस्या येत आहेत.

मंगळवार (15 जून) सकाळपासूनच एचडीएफसी बँकिंग अ‍ॅप सुरू नाही. सर्विस आउटेजमुळे युजर्स HDFC Mobile Banking App मध्ये लॉगइन करू शकत नाहीत. यावर लॉगइन केल्यानंतर युजरला एक मेसेज येत आहे. 'आम्ही मोबाईल बँकिंग अ‍ॅपमध्ये काही समस्यांचा सामना करत आहोत, यावर प्राथमिकपणे काम करत असल्याचं' मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे.

लॉगइन पेजवर येणाऱ्या मेसेजमध्ये युजरला ट्रान्झेक्शन पूर्ण करण्यासाठी नेट बँकिंगचा वापर करण्याचं सांगितलं जात आहे. ग्राहकांनी त्यांचं ट्रान्झेक्शन पूर्ण करण्यासाठी कृपया नेट बँकिंगचा वापर करा, असं मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे.

UIDAI: कुणी तुमचं Aadhaar Card तर वापरत नाही ना? घरबसल्याच ठेवा वॉच

नेट बँकिंगचा वापर करुन ट्रान्झेक्शन करण्यासाठी युजरला HDFC च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर युजरला नेट बँकिंग सेक्शनमध्ये जावं लागेल. त्यानंतर कोणती सर्विस घ्यायची आहे, ते सिलेक्ट करावं लागेल.

त्यानंतर User ID किंवा Customer ID चा वापर करुन लॉगइन करावं लागेल. नेट बँकिंगद्वारे युजर्स पैसे ट्रान्सफर करू शकतात, बिल भरणं किंवा ऑनलाईन शॉपिंगही करू शकतात. HDFC Bank ने ही समस्या कधीपर्यंत ठीक होईल याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तसंच युजर्सनी आपलं युजरनेम, पासवर्ड आणि ओटीपी किंवा इतर खासगी माहिती कुठेही शेअर करू नये असं HDFC वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Hdfc bank, Tech news