मराठी बातम्या /बातम्या /मनी /

फक्त 330 रुपयांत 2 लाखांचे विमा संरक्षण! कोरोनाने मृत्यूनंतरही नॉमिनीला मिळणार पैसे

फक्त 330 रुपयांत 2 लाखांचे विमा संरक्षण! कोरोनाने मृत्यूनंतरही नॉमिनीला मिळणार पैसे

कोरोना साथीत (Corona Pandemic) आपल्या कुटुंबाची भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे फार आवश्यक झाले आहे. तुम्ही फक्त 330 रुपयांत देखील 2 लाखांचा कवर मिळवू शकता.

कोरोना साथीत (Corona Pandemic) आपल्या कुटुंबाची भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे फार आवश्यक झाले आहे. तुम्ही फक्त 330 रुपयांत देखील 2 लाखांचा कवर मिळवू शकता.

कोरोना साथीत (Corona Pandemic) आपल्या कुटुंबाची भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे फार आवश्यक झाले आहे. तुम्ही फक्त 330 रुपयांत देखील 2 लाखांचा कवर मिळवू शकता.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 15 जानेवारी : कोरोना संसर्ग आल्यापासून माणासाचे जीवन खूप अनिश्चित झाले आहे. कधी कोणाला काय होईल आणि कोण कधी सोडून जाईल काही शाश्वती नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाची भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक झाले आहे. कोरोनाच्या काळात तुम्ही टर्म इन्शुरन्सद्वारे तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देऊ शकता. मात्र, महागड्या प्रीमियममुळे तुम्ही विमा काढू शकत नसल्यास, तुम्ही केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा (PMJJBY) लाभ घेऊ शकता. ही विमा योजना केंद्र सरकार राबवत आहे.

या योजनेंतर्गत, लाभार्थीचा कोणत्याही प्रकारे मृत्यू झाल्यास, नॉमिनी किंवा कुटुंबाला 2 लाख रुपयांची रक्कम मिळते. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर विमाधारक व्यक्तीच्या नॉमिनीला किंवा कुटुंबाला 2 लाख रुपयांचा विमा मिळेल.

ही आहे मुदत विमा योजना

PMJJBY ही मुदत विमा योजना आहे. टर्म इन्शुरन्समध्ये पॉलिसी घेणाऱ्याच्या मृत्यूनंतरच लाभ मिळतो. मुदत संपल्यानंतर पॉलिसीधारक बरा राहिल्यास त्याला कोणताही लाभ मिळत नाही.

330 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल

PMJJBY चा लाभ घेण्यासाठी, दरवर्षी 330 रुपये प्रीमियम भरावा लागतो. ही प्रीमियम रक्कम 25 मे ते 31 मे दरम्यान खात्यातून आपोआप कापली जाईल. यासाठी अर्जदाराला त्याची संमती द्यावी लागेल.

गुंतवणुकीवर कर बचतीसह दमदार रिटर्न्स हवेत? मग हा आहे तुमच्यासाठी उत्तम पर्याय

कव्हर कालावधी 1 जून ते 31 मे पर्यंत आहे.

त्याचा कव्हर कालावधी 1 जून ते 31 मे पर्यंत आहे. याचा अर्थ असा की PMJJBY पॉलिसी कोणत्याही तारखेला खरेदी केली असल्यास, पहिल्या वर्षासाठी त्याचे कव्हरेज पुढील वर्षाच्या 31 मे पर्यंत असेल. यामध्ये, योजनेत नावनोंदणी केल्यानंतर 45 दिवसांपासून जोखीम कवच उपलब्ध आहे.

बँक खाते असणे आवश्यक आहे

PMJJBY चा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे. हे बँक खाते सरकारी किंवा खाजगी बँकेत असू शकते. यानंतर अर्जदाराला PMJJBY चा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागेल.

EPFO Account : घरबसल्या UAN मध्ये बँक डिटेल्स अपडेट करा, फॉलो करा सोप्या स्टेप्स

कसा करायचा दावा?

नामनिर्देशित व्यक्तीला विमा कंपनी किंवा बँकेकडे दावा करावा लागेल जिथे विमा उतरवलेल्या व्यक्तीचा विमा उतरवला आहे. मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे लागेल. डिस्चार्ज पावतीसोबत इतर आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात.

याचा फायदा कोठून घेता येईल?

ही योजना LIC तसेच इतर खाजगी जीवन विमा कंपन्यांमार्फत चालवली जाते. तुम्हा तुमच्या बँकेला भेट देऊनही माहिती मिळू शकते, अनेक बँकांचे विमा कंपन्यांशी टाय-अप आहेत.

First published:

Tags: Corona, LIC