Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Tax Saving Investment: कर बचतीसह चांगला परतावा देणारे ELSS Fund

Tax Saving Investment: कर बचतीसह चांगला परतावा देणारे ELSS Fund

ईएलएसएस फंड म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (Equity Linked Saving Scheme -ELSS ) हा कर वाचवण्यासाठीच्या उद्देशानं तयार करण्यात आलेला म्युच्युअल फंड आहे.

ईएलएसएस फंड म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (Equity Linked Saving Scheme -ELSS ) हा कर वाचवण्यासाठीच्या उद्देशानं तयार करण्यात आलेला म्युच्युअल फंड आहे.

ईएलएसएस फंड म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (Equity Linked Saving Scheme -ELSS ) हा कर वाचवण्यासाठीच्या उद्देशानं तयार करण्यात आलेला म्युच्युअल फंड आहे.

मुंबई, 15 जानेवारी : चांगला परतावा (Good Return), सुरक्षितता (Safety) ही वैशिष्ट्ये असणारा गुंतवणूक पर्याय (Investment Option) म्हणजे म्युच्युअल फंड (Mutual Fund) असं समीकरण आता पक्कं झालं आहे. आज आपल्या देशात सर्वसामान्य गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करत आहेत. पूर्वी फक्त कर बचतीचा (Tax Benifit) गुंतवणूक पर्याय म्हणून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जात असे, मात्र आता इतर पर्यायांपेक्षा जास्त परतावा देणारा पर्याय म्हणून म्युच्युअल फंड लोकप्रिय झाला आहे. करबचत आणि चांगला परतावा ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करणाऱ्या म्युच्युअल फंडाना चांगली मागणी असते. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होताच कर बचतीचा फायदा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांना मागणी वाढते. यात सर्वात लोकप्रिय आहेत ते ईएलएसएस फंड (ELSS Fund).

ईएलएसएस फंड म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (Equity Linked Saving Scheme -ELSS ) हा कर वाचवण्यासाठीच्या उद्देशानं तयार करण्यात आलेला म्युच्युअल फंड आहे. या योजनेअंतर्गत जमा होणाऱ्या निधीपैकी 65 टक्के निधी इक्विटी मार्केटमध्ये (Equity Market) अर्थात शेअर्समध्ये (Shares) गुंतवला जातो. त्यामुळं याचा परतावा बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असतो. याबाबत कोणतीही हमी दिली जात नाही. त्यामुळं यात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी बाजारातील चढउताराकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लाइव्ह हिंदुस्थाननं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

वाचा : EPFO Account : घरबसल्या UAN मध्ये बँक डिटेल्स अपडेट करा, फॉलो करा सोप्या स्टेप्स

या ईएलएसएस फंड योजनांची मुदत किंवा लॉक-इन कालावधी (Lock -In Period) 3 वर्षांचा असतो. लॉक-इन कालावधी पूर्ण झाल्यानंतर, बाजारातील अस्थिरतेमुळे परतावा कमी असल्यास, योजनेतून बाहेर न पडता असलेल्या निधीसह गुंतवणूक पुढे चालू ठेवू शकता. बाजार वाढताच आणि तुम्ही गुंतवणूक केलेल्या योजनेची नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) वाढताच या योजनेतून बाहेर पडू शकता.

शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास शेअरची किंमत कमी असताना खरेदी केली जाते आणि किंमत वाढल्यानंतर शेअर्स विकून नफा मिळवला जातो. तेच सूत्र इथंही लागू करून आपल्या योजनेचे मूल्य वाढल्यानंतर त्यातून बाहेर पडावं. या फंडामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, तसेच करबचतीचेही (Tax Saving) फायदे मिळतात. कोणत्याही फंड हाउसमधून किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही यात गुंतवणूक करू शकता.

वाचा : गेल्या आठवड्यात शेअर बाजार 2 टक्के वधारला, पुढच्या आठवड्यात कशी असेल बाजाराची चाल?

गुंतवणूक करताना योग्य फंड निवडणे महत्त्वाचं आहे. तुमची जोखीम घेण्याची क्षमता, आर्थिक उद्दिष्टे याचा विचार करून त्यासाठी योग्य ठरेल असा फंड निवडणं लाभदायी ठरेल. तसंच फंड निवडताना त्यातील निधीची कोणत्या क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते, मार्केट कॅप स्ट्रक्चर, एक्सपेन्स रेशो इत्यादी बाबी विचारात घेणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते फंड निवडताना गुंतवणुकदाराने स्वत:च निर्णय घेण्याऐवजी आर्थिक नियोजक किंवा सल्लागाराची मदत घेणे अधिक योग्य ठरेल.

First published:

Tags: Investment, Money, Savings and investments