मुंबई, 15 जानेवारी : सध्या बँकिंग आणि इनवेस्टमेंट करताना बहुतेक कामे ऑनलाइन शक्य झाली आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय घरी बसून करु शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनेही (Employees' Provident Fund Organization) आपल्या अनेक सेवा ऑनलाइन केल्या आहेत. त्यात नव्या सेवेचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये युनिव्हर्सल अकाउंट नंबरद्वारे (UAN) बँक खाते अपडेट (Bank Account Update) करणे समाविष्ट आहे. या प्रकरणाची माहिती देताना EPFO ने ट्वीटवर आपली माहिती दिली आहे.
UAN द्वारे बँक खाते कसे अपडेट करावे?
>> तुमचे UAN द्वारे बँक खाते अपडेट करण्यासाठी, तुम्हाला प्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
>> त्यानंतर UAN आणि पासवर्डने लॉगिन करा.
>> यानंतर ड्रॉप डाउन मेनूमधून KYC निवडा.
>> बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड टाका.
>> पुढे Save पर्यायावर क्लिक करा.
>> यानंतर eKYC पर्याय निवडा आणि eKYC पूर्ण करा.
>> तुमची डिजिटली eKYC पूर्ण होईल.
>> तुम्हाला EPFO चा कन्फर्म मेसेज मिळेल.
7th Pay Commission: मोदी सरकार वाढवणार या कर्मचाऱ्यांचा पगार, लवकरच होऊ शकते घोषणा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांसाठी ई-नॉमिनेशनची सुविधा प्रदान करते. याच्या मदतीने नामनिर्देशित व्यक्तीचे नाव जोडले जाऊ शकते. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हे करू शकता. यासाठी कोणतीही अंतिम मुदत नाही. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही अजूनही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. पीएफशी संबंधित अनेक सुविधांसाठी ते आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.