मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PPF account merge: एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती आहेत? अशाप्रकारे करा मर्ज

PPF account merge: एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती आहेत? अशाप्रकारे करा मर्ज

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा गुंतवणुकीचा चांगला मार्ग आहे. मात्र पीपीएफ खात्याशी संबंधित नियम कडक आहेत. जर तुम्ही एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा गुंतवणुकीचा चांगला मार्ग आहे. मात्र पीपीएफ खात्याशी संबंधित नियम कडक आहेत. जर तुम्ही एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा गुंतवणुकीचा चांगला मार्ग आहे. मात्र पीपीएफ खात्याशी संबंधित नियम कडक आहेत. जर तुम्ही एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर: गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांचा विचार करताना काही जुनेच पण कमी जोखमीचे पर्याय शक्यतो निवडले जातात. पीपीएफ त्यापैकीच एक आहे. तुमचे देखील पीपीएफ खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा गुंतवणुकीचा एक चांगला मार्ग आहे. त्यात गुंतवलेल्या रकमेवर करमाफी, मुदतपूर्तीवर करमुक्त परतावा आणि सरकारी स्कीम असल्याने कमी जोखीम प्रमुख कारण आहे. सध्या पीपीएफवर वार्षिक व्याजदर 7.1 टक्के आहे. पीपीएफ खात्याशी संबंधित नियम (PPF Account Rules) कडक आहेत. जर तुम्ही एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडले असेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

जर एखाद्या ठेवीदाराने एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असतील, तर उघडण्यात आलेले दुसरे आणि त्यानंतरचे खाते अनियमित मानले जाते. परंतु काही प्रकरणांमध्ये पीपीएफमध्ये काही सूट दिली जाते. वित्त मंत्रालय अशा अनियमित खाती/ठेवींना एका खात्यात एकापेक्षा जास्त PPF खाते विलीन करून नियमित करते.

हे वाचा-'या' ऑटो शेअरमध्ये 29 टक्के रिटर्न्स अपेक्षित, मोतीलाल ओसवालकडून BUY रेटिंग

पोस्ट विभागाने सांगितली विलिनीकरणाची प्रक्रिया

पोस्ट विभागाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले ज्यामध्ये एकापेक्षा जास्त PPF खाती असल्यासती एकाच पीपीएफ खात्यात मर्ज कशी करायची याबाबत माहिती दिली होती. या परिपरत्रकानुसार, जर एखाद्याने एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असतील, तर उघडण्यात आलेले दुसरे आणि त्यानंतरचे खाते अनियमित मानले जाते. कारण एखादा ठेवीदार केवळ एकच पीपीएफ खाते उघडू शकतो. अशावेळी जर तुम्ही दोन PPF खाती उघडली असतील तर ती वेळीच मर्ज करा. हे अधिकचे खाते तुम्हाला एका खात्यात मर्जच करावे लागेल कारण पीपीएफ खाते मॅच्युरिटीआधी बंद करण्याची परवानगी देखील मिळत नाही.

ठेवीदारांकडे आहे हा पर्याय आहे

गुंतवणूकदारांना त्यांच्या आवडीचे पीपीएफ खाते ठेवण्याचा पर्याय असेल. यासाठी अट अशी आहे की दोन्ही खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम निर्धारित ठेव मर्यादेत असावी. सध्या ही मर्यादा वर्षाला दीड लाख रुपये आहे. तुमच्याकडे वेगवेगळ्या बँकांमध्ये एकापेक्षा जास्त पीपीएफ किंवा पोस्ट ऑफिसमध्ये दोन खाती असल्यास, पीपीएफ खाते हस्तांतरण प्रक्रियेचा वापर करून सहजपणे विलीन केले जाऊ शकते.

हे वाचा-क्रेडिट कार्डचा वापर करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा कर्जात बुडाल

पीपीएफ खाते उघडण्याचे नियम

15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह हे खाते कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडले जाऊ शकते. परंतु एखादी व्यक्ती त्याच्या नावावर एकच पीपीएफ खाते उघडू शकते. मग ते बँकेत उघडलेले असो किंवा पोस्ट ऑफिसमध्ये.

First published:

Tags: Open ppf account, PPF