मराठी बातम्या /बातम्या /मनी /

क्रेडिट कार्डचा वापर करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा कर्जात बुडाल

क्रेडिट कार्डचा वापर करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा कर्जात बुडाल

क्रेडिट कार्डवर ऑफर्स व्यतिरिक्त अनेक फायदे मिळतत असताना, तर दुसरीकडे, काही माहितीच्या अभावामुळे, तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागू शकतात.

क्रेडिट कार्डवर ऑफर्स व्यतिरिक्त अनेक फायदे मिळतत असताना, तर दुसरीकडे, काही माहितीच्या अभावामुळे, तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागू शकतात.

क्रेडिट कार्डवर ऑफर्स व्यतिरिक्त अनेक फायदे मिळतत असताना, तर दुसरीकडे, काही माहितीच्या अभावामुळे, तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागू शकतात.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 5 नोव्हेंबर : सणासुदीच्या (Diwali 2021) काळात अनेक ब्रँड्सवर ऑनलाईन आणि ऑफलाईन (Online and Offline Shopping) अशा दोन्ही ठिकाणी सवलती आहेत. त्यामुळे अनेकांना आपल्या आवडत्या वस्तू घेण्याचा मोह आवरत नाही. मोठ्या संख्येने लोक क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करुन खरेदी करतात. खिशात पैसे नसतानाही क्रेडिट कार्डमुळे आपल्या आवडीची खरेदी करण्याची संधी मिळते आणि कार्ड होल्डरला ठराविक वेळेनंतर पैसे द्यावे लागतात. एकीकडे, क्रेडिट कार्डवर ऑफर्स व्यतिरिक्त अनेक फायदे मिळतत असताना, तर दुसरीकडे, काही माहितीच्या अभावामुळे, तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागू शकतात. क्रेडिट कार्डच्या चुकीच्या वापरामुळे तुम्ही आर्थिक संकटातही सापडू शकता. त्यामुळे क्रेडिट कार्डचा योग्य वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.

तुमच्या गरजेनुसार क्रेडिट कार्डचा वापर करा

सर्व बँका वेगवेगळ्या प्रकारचे (All Banks Credit Card) क्रेडिट कार्ड देतात. यामध्ये वेगवेगळे शुल्क आणि ऑफर आहेत. तुम्ही क्रेडिट कार्ड घेता तेव्हा तुमच्या गरजा लक्षात ठेवा. तुमच्या गरजा काय आहेत आणि तुमच्यासाठी काय योग्य असेल ते शोधा. तसेच जास्त क्रेडिट कार्ड घेणे टाळा. त्याऐवजी फक्त 2-3 चांगली कार्ड ठेवा. कार्डची मर्यादा जितकी तुम्हाला पे करता येईल तितकी घ्या.

या' स्मॉल फायनान्स बँका सेव्हिंग्ज अकाउंटवर देतात 7 टक्के व्याज; जाणून घ्या सविस्तर

दरमहा खरेदी आणि क्रेडिट कार्डच्या खर्चाचा अंदाज लावा

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला क्रेडिट कार्डच्या खर्चाचा अंदाज असला पाहिजे. यामुळे तुमच्यावर कर्जाचा बोजा पडणार नाही. तुमच्या क्रेडिट कार्डचं लिमिट जरी जास्त असलं तरी खरेदी केल्यानंतर त्या पैशांची परतफेड आपण योग्य पद्धतीने आणि सहज करु शकतो का हे लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा उत्पन्नापेक्षा खर्च वाढला तर तुम्ही अडचणीत सापडाल.

Gold Prices Today: सोन्याच्या किंमतीत 600 रुपयांची वाढ, चांदीतही जबरदस्त उसळी

प्रमोशनल ऑफर्सकडे लक्ष द्या

जर तुम्ही क्रेडिट कार्डने खरेदी करत असाल, तर काहीही घेण्यापूर्वी, वेगवेगळ्या ठिकाणी चालणाऱ्या प्रमोशनल ऑफर्स तपासा. सणासुदीच्या हंगामात आणि विशेष प्रसंगी क्रेडिट कार्डने खरेदी करण्यावर चांगल्या सवलती आणि ऑफर उपलब्ध असतात. तुम्हाला मोठ्या रकमेच्या खरेदीचे No Cost EMI मध्ये रूपांतर करण्याची संधी देखील मिळते. यामुळे तुमच्यावर भार पडणार नाही.

देय तारखेपूर्वी संपूर्ण थकबाकीची रक्कम भरा

क्रेडिट कार्ड खरेदीवर पेमेंट करण्यासाठी बँक 45 ते 50 दिवस देते. परंतु शेवटच्या तारखेपूर्वी संपूर्ण थकबाकीची रक्कम भरणे तुमच्यासाठी चांगले होईल. उशीरा झाल्यास, बँक तुमच्याकडून दंड आणि अधिक व्याज आकारते. हे व्याज दरवर्षी 40 टक्क्यांहून अधिक असू शकते.

First published:

Tags: Credit card, Loan, Money