मुंबई, 5 नोव्हेंबर : शेअर बाजारात (Share Market) हजारो कंपन्यामधून गुंतवणुकीसाठी एखादी कंपनी निवडणे कठीण काम असतं. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार एक्सपर्ट आणि मोठ्या गुंतवणूकदारांना फॉलो करतात. ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) यांना आयशर मोटर्समध्ये (Eicher Motors share) 29 टक्के रिटर्न्सच्या टार्गेटसह गुंतवणुकीचा सल्ला आहे. मोतीलाल ओसवालचं म्हणणं आहे की, आयशर मोटर्समध्ये 1 वर्षात आपण हे लक्ष्य (Eicher Motors share target) साध्य होताना पाहू शकतो. सध्या हा स्टॉक 2522 रुपयांच्या आसपास आहे. एक वर्षात 29 टक्क्यांनी वाढ दाखवून, स्टॉक 3250 रुपयांवर जाताना दिसेल.
मोतीलाल ओसवालचा अंदाज आहे की, High Growth Realization मुळे कंपनीची वाढ आमच्या अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 8.7 टक्क्यांनी वाढून 373 कोटी रुपये झाला आहे. तर आर्थिक वर्ष 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 343 कोटी रुपये होता, तर आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 237 कोटी रुपये होता.
या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 5.4 टक्क्यांनी वाढून 2,250 कोटी झाले. जे मागील वर्षी या तिमाहीत 2134 कोटी होते. तर या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत उत्पन्न 1974 कोटी होते.
रॉयल एनफिल्डचे व्हॉल्यूम जवळपास सपाट राहिली. Volvo Eicher Commercial Vehicles (VECV) च्या व्यवसायावर नजर टाकली तर, कंपनीने या कालावधीत एकूण 15,134 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 8,167 युनिट्सची विक्री केली होती.
Business Idea: नोकरी करता करता अत्यंत कमी खर्चात सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल बंपर कमा
मोतीलाल ओसवाल सांगतात की, आयशर मोटर्सने देशांतर्गत बाजारपेठे सोबत परदेशी बाजारपेठेतही आपले नेटवर्क विकसित केले आहे. कंपनीने आपल्या परदेशी नेटवर्कमध्ये 9 एक्स्क्लुझिव्ह स्टोअर जोडले आहेत. याशिवाय 3 नवीन मल्टीब्रँड आउटलेट देखील जोडण्यात आले आहेत. यासह, कंपनीच्या एकूण एक्स्क्लुझिव्ह स्टोअरची संख्या 149 वर पोहोचली आहे तर एकूण स्टोअरची संख्या 650 हून अधिक झाली आहे.
याशिवाय, आयशर मोटर्सने दुसऱ्या तिमाहीत 14 नवीन स्टुडिओ स्टोअर्स जोडले आणि त्यांच्या स्टुडिओची एकूण संख्या 1052 झाली आहे. कंपनीने देशांतर्गत बाजारात 20 नवीन स्टोअर्स देखील जोडले आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दुकानांची संख्या 1053 वर गेली आहे. भविष्यातही कंपनीच्या व्यवसायात चांगली वाढ होईल हे लक्षात घेऊन या शेअरचे BUY रेटिंग लक्षात घेऊन मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने 3250 रुपयांचे टार्गेट ठेवून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market