नवी दिल्ली, 26 जानेवारी: तुम्ही देखील पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या पैशांबाबत चिंता राहणार नाही. पोस्टाच्य छोट्या बचत योजनांमध्ये (Small Saving Scheme) तुम्ही कमी पैशात सुरक्षित गुंतवणूक करू शकता. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला काही काळातच निश्चित रिटर्न मिळण्याची गॅरंटी आहे. आम्ही तुम्हाला काही योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही बंपर रिटर्न मिळवू शकता. या योजना 5 ते अगदी 15 वर्षांपर्यंत देखील आहेत.
या योजनांमध्ये करा गुंतवणूक
चांगला रिटर्न देणाऱ्या पोस्टाच्या योजनांमध्ये पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF), रिकरिंग डिपॉझिट (RD), नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC) आणि टाइम डिपॉझिट (TD) स्कीम इ. योजनांचा समावेश आहे. या योजनांमध्ये गुंतवणूकदार काही वर्षांमध्येच एक चांगला फंड तयार करू शकतात.
कोणत्या योजनेमध्ये मिळेल किती व्याज
-पब्लिक प्रोव्हिडेंट फंड: 7.1%
-सेव्हिंग डिपॉझिट: 4%
-एका वर्षासाठी टाइम डिपॉझिट: 5.5%
- 2 वर्षासाठी टाइम डिपॉझिट: 5.5%
(हे वाचा-डिजिटल मतदार ओळखपत्र कसं मिळवाल? वाचा तुमच्या मनातील 19 प्रश्नांची उत्तरे)
-3 वर्षासाठी टाइम डिपॉझिट: 5.5%
-5 वर्षासाठी टाइम डिपॉझिट: 6.7%
-5 वर्षांसाठी रेकरिंग डिपॉझिट: 5.8%
-SCSS 5 वर्षांसाठी: 7.4%
-MIS 5 वर्षांसाठी: 6.6%
-NSC 5 वर्षांसाठी: 6.8%
पब्लिक प्रोव्हिडेंट फंड
यामध्ये तुम्ही कमीतकमी 500 रुपये ते 1,50,000 रुपयांची वार्षिक गुंतवणूक करू शकता. पीपीएफमध्ये गुंतवणूक केली असल्यास आयकर कायदा सेक्शन 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते. शिवाय व्याजातून मिळालेल्या उत्पन्नावर देखील सूट आहे. सध्या यामध्ये 7.1 टक्के दराने व्याज मिळते आहे, देशातील कोणतीच कमर्शिअल बँक एवढा जास्त व्याजदर देत नाही. स्टेट बँक ऑफ इंडियामध्येही एफडीवरील व्याजदर 5 ते 5.5 टक्के आहे.
किसान विकास पत्र
पोस्टाच्या किसान विकास पत्र योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीमध्ये मॅच्योरिटी पीरियड (Maturity Period) नंतर गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम मिळते. यामध्ये कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा यामध्ये नाही आहे. ही योजना विशेषत: शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे.
(हे वाचा-Gold Price Today: सोने दरात घसरण, चांदी वधारली; जाणून घ्या काय आहे आजचा भाव)
पोस्ट ऑफिस आरडी
पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) ही योजना छोट्या बचत योजनांमध्ये सर्वात बेस्ट आहे. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खाते कमीत कमी पाच वर्षांसाठी उघडण्यात येते. बँकामध्ये सहा महिने, एक वर्ष, दोन वर्ष या कालावधीसाठी देखील आरडी खाते उघडता येते.
नॅशनल सेव्हिंग स्कीम
पोस्टाच्या पाच वर्षांच्या नॅशनल सेव्हिंग स्कीम (NSC) मध्ये गुंतवणूक केल्यास 6.8 टक्के रिटर्न मिळतो. यामध्ये पाच वर्षांचा लॉक इन पीरियड असतो म्हणजे तुम्ही हे पैसे पाच वर्षांनंतर काढू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.