नवी दिल्ली, 25 जानेवारी : केंद्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission) राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून सोमवार, 25 जानेवारी 2021 रोजी डिजिटल मतदान ओळखपत्र (Digital Voter Card) सुविधा अर्थात ई-एपिक (e-EPIC -Electronic Electoral Photo Identity Card) जारी केली आहे. पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना डिजिटल मतदारकार्ड वापरता येणार आहे. या डिजिटल मतदार कार्डाबाबत आवश्यक ती माहिती खाली दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदारकार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करु शकतात. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स अगोदरच आपल्याला डिजिटल स्वरुपात उपलब्ध झाली आहेत. ( ECI going to launch Digital Voter Card from 25 January know how to download)
1) ई-एपिक मतदार ओळखपत्र (Elector’s Photo Identity Card - EPIC) म्हणजे काय?
हे अत्यंत सुरक्षित असे पीडीएफ स्वरूपातील मतदार ओळखपत्र आहे. ते मोबाइलवर किंवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करता येणार आहे. मतदार मोबाइलवर स्टोअर करून ठेवता येईल किंवा डिजिटल लॉकरमध्ये पीडीएफ स्वरुपात अपलोड करून ठेवता येईल. त्याची प्रिंट करून लॅमिनेट करता येईल.
हे ही वाचा-मोठी बातमी: आता 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोट चालणार नाही? RBI ने दिली माहिती
2) हे कसं डाऊनलोड करता येईल?
व्होटर पोर्टल किंवा व्होटर हेल्पलाईन, मोबाइल अॅप किंवा एनव्हीएसपी वरून मतदारांना हे कार्ड डाऊनलोड करता येईल.
Voter Portal: http://voterportal.eci.gov.in/
NVSP: https://nvsp.in/
Voter Helpline Mobile App –
Android https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
iOS https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004
3) ई-एपिक कोणाला मिळू शकते ?
सर्व मतदारांना डिजिटल कार्ड पीडीएफ स्वरुपात मिळेल. नव्या मतदारांना दोन्ही स्वरुपातील मतदान कार्ड मिळणार आहे. डिजिटल मतदान ओळखपत्रावर मतदाराच्या माहितीसह क्यूआर कोड देखील देण्यात येणार आहे. डिजिटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे अकाँऊट तयार करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करता येईल.
4) डिजिटल कार्डाचा फायदा काय?
पहिला फायदा म्हणजे प्रवासाच्या तिकिटाप्रमाणे तुम्ही तुमचं एपीक तुमच्या मोबाइल फोनमध्ये डाउनलोड करू शकाल. त्यामुळे तुम्हाला त्याची प्रिंट सोबत बाळगावी लागणार नाही. दुसरं म्हणजे निवडणूक आयोगाचा देशभरातील ओळखपत्रं छापण्याचा मोठा खर्च वाचेल. ती बचत झालेली रक्कम इतर कामांत वापरता येईल. त्याचबरोबर सध्याच्या कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असल्याने, तेही यामुळे पाळलं जाणार आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, हे ओळखपत्र पाठवण्यासाठी सरकार तुमचा मोबाइल क्रमांक नोंदवून घेणार आहे. तो डेटा सरकारकडे तयार होईल.
हे देखील वाचा - Driving Licence काढण्याच्या नियमांमध्ये बदल; केवळ याच पद्धतीने अर्ज करता येणार
5) ई-एपीक मिळवण्यासाठी काय करावं लागेल?
सर्वसाधारण सर्व मतदार ज्यांच्याकडे वैध मतदार कार्ड आहे, अशा सर्व लोकांना हे डिजिटल मतदार कार्ड मिळू शकते. नोव्हेंबर -डिसेंबर 2020 मध्ये मतदार यादीत नाव नोंदणी केलेल्या आणि तुमचा मोबाईल नंबर नोंदवला आहे, अशा सर्वांना एसएसएस पाठवला जाईल. त्यानंतर 25 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत ई एपिक डाउनलोड करता येईल. अन्य मतदारांना एक फेब्रुवारी 2021 पासून ई-एपिक डाउनलोड करता येईल.
6) एपिक हरवल्यास पुन्हा ई -एपिक डाऊनलोड करता येईल का?
http://voterportal.eci.gov.in/ or http://electoralsearch.in/ या वेबसाईटवरून मतदार यादीत तुमचं नाव शोधा, तुमचा मतदार ओळख क्रमांक मिळाल्यानंतर तो नोंदवा आणि ई-एपिक डाऊनलोड करा.
7) माझ्यकडे एपिक क्रमांक नाही, मात्र माझ्याकडे फॉर्म 6 रेफरन्स नंबर आहे, मला ई-एपिक डाऊनलोड करता येईल का?
हो. तुम्ही फॉर्म 6 रेफरन्स नंबर वापरून ई-एपिक डाऊनलोड करू शकता.
8) माझ्याकडे एपिक नंबर नाही, तर मी ई-एपिक डाऊनलोड कसे करता येईल?
http://voterportal.eci.gov.in/ or http://electoralsearch.in/ या वेबसाईटवरून मतदार यादीत तुमचं नाव शोधा, तुमचा मतदार ओळख क्रमांक मिळाल्यानंतर तो नोंदवा आणि ई-एपिक डाऊनलोड करा.
9) ई -एपिकचा फाईल फॉरमॅट काय आहे ?
पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट अर्थात पीडीएफ फॉरमॅटमध्ये ई -एपिक डाऊनलोड करू शकता.
10) ई -एपिकची फाईल साईज काय आहे?
250 केबी
11) मतदान केंद्रावर ओळखपत्र दाखवण्यासाठी मी ई-एपिक प्रिंट करू शकतो का?
हो, तुम्ही ई-एपिक डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून ती मतदार केंद्रावर ओळख पत्र म्हणून वापरू शकता.
12) ई-एपिक डाऊनलोड करण्याची काय पद्धत आहे ?
http://voterportal.eci.gov.in/ or https://nvsp.in/ या वेबसाईटवरून आणि व्होटर हेल्पलाईन मोबाईल अॅपवरून खालील टप्प्यात तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.
1 व्होटर पोर्टलवर लॉग इन करा किंवा रजिस्टर करा.
2 मेन्यूमधील डाऊनलोड ई- एपिकवर क्लिक करा.
3 एपिक नंबर किंवा फॉर्म रेफरन्स नंबर भरा.
4 रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.
5 डाऊनलोड ई- एपिकवर क्लिक करा.
6 मोबाईल नंबरवर रजिस्टर नसेल तर ई केवायसीवर क्लिक करा आणि ती प्रक्रिया पूर्ण करा.
7 फेस लाईव्ह्नेस व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
8 केवायसी पूर्ण करून मोबाइल नंबर अपडेट करा.
9 ई-एपिक डाऊनलोड करा.
13) ई -केवायसी काय आहे ?
ई केवायसी ही मतदार हयात असल्याचा पुरावा देणारी प्रकिया आहे. शारीरिक हालचालीतून, लाईव्ह फोटो काढून एपिक डेटामध्ये वापरण्यात आलेल्या फोटोशी पडताळून पाहिला जातो.
14) ई केवायसी अपूर्ण राहिल्यास ?
प्रादेशिक निवडणूक कार्यालयाला भेट द्या आणि फोटो ओळखपत्रासह मोबाईल नंबर अपडेट करा.
15) ई केवायसीसाठी काय लागते?
कॅमेरासह मोबाईल फोन,टॅब किंवा वेबकेमसह लॅपटॉप आणि डेस्कटॉप.
16) माझा मोबाईल नंबर मतदार यादीत रजिस्टर नाही, तरीही मला ई-एपिक डाऊनलोड करता येईल का?
हो, करता येईल, तत्पूर्वी ई केवायसी करून मोबाईल नंबर अपडेट करा.
17) मी मतदार यादीत रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आता वापरत नाही, मी नंबर अपडेट करू शकतो का?
हो, तुम्ही ई -केवायसी पूर्ण करून मोबाईल नंबर अपडेट करा.
18) मी स्मार्टफोनवर ई -एपिक डाऊनलोड करू शकतो का?
हो, व्होटर हेल्पलाईन मोबाईल एपवरून तुम्ही ई -एपिक डाऊनलोड करू शकता.
19) माझे कुटुंबीय याच मोबाईल नंबरचा वापर करतात, तरीही मी ई एपिक करू शकतो का?
कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकच मोबाईल नंबर वापरत असतील तरीही ई -केवायसी पूर्ण करून तुम्ही ई -एपिक डाऊनलोड करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election commission, India