Post Office ची ही योजना ठरेल फायद्याची, कमी गुंतवणुकीतून कसे मिळतील 16 लाख?

Investment Tips in Post Office: पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला अनेकजण पसंती देतात कारण या योजनांमध्ये जोखीम कमी असते आणि रिटर्न चांगला मिळतो

Investment Tips in Post Office: पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला अनेकजण पसंती देतात कारण या योजनांमध्ये जोखीम कमी असते आणि रिटर्न चांगला मिळतो

  • Share this:
    नवी दिल्ली, 21 जुलै: तुम्ही पूर्णपणे सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल अर्थात गुंतवणूक करताना कोणतीही जोखीम नको असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या (Post Office) विविध योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्टाच्या योजनांमध्ये कमी जोखमीसह जास्त रिटर्न मिळतो. पोस्ट ऑफिसच्या अशा काही स्मॉल सेव्हिंग स्कीम्स आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून चांगला रिटर्न (Earn Money) मिळवू शकता. या योजनांपैकी एक महत्त्वाचा पर्याय पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) हा आहे. यामध्ये तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल. काय आहे आरडी स्कीम? तुम्हाला कमी पैशांच्या गुंतवणुकीतून आरडी स्कीम सुरू करता येईल. यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील. या आरडी योजनेमध्ये तुम्ही महिन्याला कमीत कमी 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता. यापेक्षा जास्त तुम्ही 10 च्या पटीमध्ये कितीही रुपयांची मासिक गुंतवणूक करता येईल. जास्तीत जास्त रक्कम जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही आहे. पोस्टाच्या आरडीमध्ये तुम्हाला चांगला व्याजदर मिळेल आणि सरकारी गॅरंटी असल्याने ही योजना सुरक्षित आहे. हे वाचा-EPFO: पीएफ खातेधारक असाल तर तुम्हालाही मिळेल पेन्शनचा लाभ, वाचा काय आहे नियम वाचा किती मिळेल व्याज? गुंतवणुकदारांच्या मते ही योजना खात्रीशीर रिटर्न देणारी योजना आहे. इंडिया पोस्ट वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर 5.8 टक्क्याने व्याज मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटचे खाते पाच वर्षांसाठी उघडण्यात येते. हा पर्याय देखील एफडी प्रमाणेच एक चांगला आर्थिक पर्याय आहे. मात्र याठिकाणी गुंतवणुक अधिक फायद्याची आहे. एफडीमध्ये तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागते. तर आरडीमध्ये तुम्हाला एसआयपी प्रमाणे वेगवेगळ्या इन्स्टॉलमेंटमध्ये महिन्याच्या महिन्याला गुंतवणूक करता येते. यामध्ये तुमच्या खात्यामध्ये व्याज तिमाही आधारावर कंपाउंडिंग होऊन जोडले जाते. दरम्यान सरकारकडून प्रत्येक तिमाहीला छोट्या बचत योजनांसाठीचे व्याजदर अपडेट केले जातात. हे वाचा-Gold Price Today: सोन्याच्या किंमतींचा आलेख चढताच, आजही दर 47 हजारांपार! 10 हजारांच्या गुंतवणुकीस सुरुवात करून मिळवा 16 लाख तुम्ही जर दरमहा 10000 रुपयांची गुंतवणूक 10 वर्षांसाठी केली तर मोठा फंड उभारू शकता. सध्याच्या व्याजदराच्या आधारे तुम्हाला मॅच्युरिटीवर 16,26,476 लाख रुपये मिळतील. आरडीबाबत महत्त्वाचे मुद्दे -एकाच व्यक्तीच्या नावावर कितीही आरडी काढता येतात. केवळ व्यक्तिगत स्वरूपातील खाते या गुंतवणुकीमध्ये सुरू करता येते. कुटुंब किंवा संस्थेच्या नावावर आरडी काढता येत नाही. -दोन ज्येष्ठ नागरिक एकत्र जॉइंट आरडी देखील काढू शकतात. -जर तुम्ही वेळेत आरडीचा हप्ता नाही भरला तर तुम्हाला दंड द्यावा लागेल. हप्ता भरण्यास उशीर झाल्यास तुम्हाला दर महिन्याला एक टक्के दंड भरावा लागेल -तुम्ही सलग चार हप्ते जमा करू शकला नाहीत तर तुमचं आरडी खातं बंद होईल. मात्र खातं बंद झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात ते पुन्हा सक्रीय करता येईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: