Home /News /money /

Gold Price Today: सोन्याच्या किंमतींचा आलेख चढताच, आजही दर 47 हजारांपार!

Gold Price Today: सोन्याच्या किंमतींचा आलेख चढताच, आजही दर 47 हजारांपार!

जाणकारांच्या मते, या वर्षअखेरपर्यंत सोन्याचे दर रेकॉर्ड तोडून 60 हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचू शकतात. अशावेळी गुंतवणुकदार चांगला फायदा कमावू शकतात

    नवी दिल्ली, 21 जुलै: सोन्याच्या किंमतीत आजही वाढ झाली आहे तर चांदीचे दर आज उतरले (Gold and Silver Price Today) आहेत. गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते बुधारी 22 कॅरेट सोन्याचे दर (Gold price) प्रति तोळा 47,040 रुपयांवरुन वाढून 47,300 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर (Silver price) 67,500 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. उत्पादन शुल्क, राज्यातील कर इ. बाबींमुळे सोन्याच्या दागिन्यांची प्रत्येक राज्यातील किंमत विभिन्न असते. दरम्यान बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 260 रुपये प्रति तोळाने वाढून 48,300 रुपये झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 48,040 रुपये प्रति तोळा होते. चांदीचे दर आधी 67,800 रुपये प्रति किलो होते, त्यामध्ये 300 रुपयांची घसरण होत दर  67,500 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. महत्त्वाच्या शहरातील सोन्याचे दर (22 कॅरेट) मुंबई-  47,300 रुपये प्रति तोळा नवी दिल्ली- 47,400 रुपये प्रति तोळा चेन्नई- 45,660 रुपये प्रति तोळा हे वाचा-सावधान! आता नोकरीसाठी थेट होतेय PM मोदींच्या नावे फसवणूक, उकळली जातेय नोंदणी फी का वाढले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारल्यामुळे सोन्यामध्ये तेजी आली आहे. सोमवारी सोन्याच्या किंमती घसरल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई आज होत आहे. हे वाचा-Aadhaar Card वरील मोबाइल क्रमांक अपडेट करायचा आहे का? अशी मिळेल घरपोच सेवा काय आहे तज्ज्ञांचं मत जाणकारांच्या मते, या वर्षअखेरपर्यंत सोन्याचे दर रेकॉर्ड तोडून 60 हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचू शकतात. अशावेळी गुंतवणुकदार चांगला फायदा कमावू शकतात. सोन्यामधील गुंतवणुकीबाबत बोलायचं झालं तर गेल्यावर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिला आहे. तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सध्या सोनंखरेदीसाठी उत्तम वेळ आहे आणि सोनं हा एक चांगला पर्याय देखील आहे, ज्यामध्ये चांगला रिटर्न मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver

    पुढील बातम्या