मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPFO: पीएफ खातेधारक असाल तर तुम्हालाही मिळेल पेन्शनचा लाभ, वाचा काय आहे नियम

EPFO: पीएफ खातेधारक असाल तर तुम्हालाही मिळेल पेन्शनचा लाभ, वाचा काय आहे नियम

नियमांनुसार, ईपीएफ खात्यात केलेल्या योगदानाचा (PF Contribution) एक भाग ईपीएस खात्यात जमा होतो. हे योगदान दरमहा 6500 आणि 15000 रुपये वेतनमानानुसार केले जाते.

नियमांनुसार, ईपीएफ खात्यात केलेल्या योगदानाचा (PF Contribution) एक भाग ईपीएस खात्यात जमा होतो. हे योगदान दरमहा 6500 आणि 15000 रुपये वेतनमानानुसार केले जाते.

नियमांनुसार, ईपीएफ खात्यात केलेल्या योगदानाचा (PF Contribution) एक भाग ईपीएस खात्यात जमा होतो. हे योगदान दरमहा 6500 आणि 15000 रुपये वेतनमानानुसार केले जाते.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 21 जुलै: तुमच्या पगारातून कापली जाणारी पीएफची रक्कम भविष्यात तुम्हाला पेन्शन मिळवून देणारी ठरेल. तुमच्या पगारातून प्रोव्हिडेंट फंडच्या स्वरुपात कापली जाणारी रक्कम दोन प्रकारात विभागली जाते. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे प्रोव्हिडेंट फंड (Provident Fund) अर्थात ईपीएफ (EPF) आणि दुसरा प्रकार म्हणजे पेन्शन फंड (Pension Fund) अर्थात ईपीएस (EPS). याकरता कर्मचाऱ्यांच्या पगारातून एकूण 12 टक्क्यांची कपात केली जाते. एवढीच रक्कम कंपन्यांकडून किंवा तुम्ही ज्याठिकाणी नोकरी करताय त्या संस्थेकडून पीएफ खात्यात जमा केली जाते.

या कपातीपैकी 3.67 टक्क्यांच्या हिस्सा तुमच्या ईपीएफ खात्यात जमा होतो, तर कपातीचा 8.33 टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत जमा होते. ईपीएस खात्यात दर महिन्याला जास्तीत जास्त 1,250 रुपये इतकी रक्कम जमा केली जाते.

पेन्शनसाठी आहेत या अटी

पेन्शन त्याच लोकांना मिळू शकते, जे ईपीएस (EPS) अर्थात एम्प्लॉयी पेन्शन स्कीम  (Employees Pension Scheme) 1995 मध्ये 16 नोव्हेंबर 1995 ला किंवा त्याआधी सहभागी झाले आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांन ईपीएस अकाउंटमध्ये कमीतकमी 10 वर्ष योगदान करणं आवश्यक आहे. कर्मचाऱ्याकडून हे योगदार एकच नियोक्ता किंवा अधिक नियोक्त्यांअंतर्गत काम करताना केले जाऊ शकते.

हे वाचा-पूर्ण करा स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न! ही बँक स्वस्तात विकतेय प्रॉपर्टी

ईपीएस खात्यात किती केलं जातं योगदान?

नियमांनुसार, ईपीएफ खात्यात केलेल्या योगदानाचा (PF Contribution) एक भाग ईपीएस खात्यात जमा होतो. हे योगदान दरमहा 6500 आणि 15000 रुपये वेतनमानानुसार केले जाते. जर आपण 1 सप्टेंबर 2014 पूर्वी या योजनेत सामील झाला असाल तर दरमहा 6500 रुपये पगाराच्या अनुषंगाने तुम्हाला योगदान द्यावे लागेल, त्यानंतर तुम्ही या योजनेत सामील झाला असाल तर तुम्हाला दरमहा 15000 रुपये प्रति महिन्याच्या पगारावर योगदान द्यावे लागेल.

हे वाचा-सावधान! आता नोकरीसाठी थेट होतेय PM मोदींच्या नावे फसवणूक, उकळली जातेय नोंदणी फी

उदा. जर तुम्ही या स्कीममध्ये 2011 मध्ये जोडले गेले असाल, तर 31 ऑगस्ट 2014 पूर्वी 6500 रुपयांवर दरमहा 8.33 टक्क्यांच्या हिशोबाने तुम्हाला योगदान करावे लागेल. अर्थात तुमचे दरमहा 541 रुपये EPS मध्ये जमा होतील. तुम्ही 1 सप्टेंबर 2014 नंतर या स्कीमशी जोडले गेले असाल तर तुम्हाला 15000 रुपयांवर 8.33 टक्के अर्थात 1250 रुपये योगदान द्यावे लागेल.

First published:

Tags: Epfo news, Money, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal