मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पोस्टाची विशेष योजना, 100 रुपयांच्या गुंतवणुकीतून होणार मोठा फायदा

पोस्टाची विशेष योजना, 100 रुपयांच्या गुंतवणुकीतून होणार मोठा फायदा

छोट्या बचतीतून अधिक फायदा मिळवण्यासाठी पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) या योजनेला जास्त पसंती दिली जाते. या योजनेमध्ये अधिक व्याजाबरोबरच करामध्येही सूट मिळते.

छोट्या बचतीतून अधिक फायदा मिळवण्यासाठी पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) या योजनेला जास्त पसंती दिली जाते. या योजनेमध्ये अधिक व्याजाबरोबरच करामध्येही सूट मिळते.

छोट्या बचतीतून अधिक फायदा मिळवण्यासाठी पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) या योजनेला जास्त पसंती दिली जाते. या योजनेमध्ये अधिक व्याजाबरोबरच करामध्येही सूट मिळते.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 08 मार्च : छोट्या बचतीतून अधिक फायदा मिळवण्यासाठी पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) या योजनेला जास्त पसंती दिली जाते. या योजनेमध्ये अधिक व्याजाबरोबरच करामध्येही सूट मिळते. त्याचप्रमाणे 1 ऑक्टोबरपासून 5 वर्षांसाठीच्या एनएससीवर व्याजदर 7.9 टक्के करण्यात आला आहे. देशातील कोणतीही बँक एवढा मोठा व्याजदर देत नाही आहे. त्यामुळे एनएससीमध्ये गुंतवणूक करणं अधिक फायद्याचं आहे.

100 रुपयांमध्ये उघडू शकता खातं

पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेसाठीचा अवधी 5 वर्षांचा आहे. यामध्ये कमीतकमी 100 रुपये भरुन तुम्ही खातं उघडू शकता. गुंतवणुकीच्या जास्तीत जास्त रकमेसाठी मर्यादा नाही आहे.

काय आहेत फायदे?

NSC योजनेअंतर्गत तुम्ही देशभरातील पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेमध्ये खातं उघडू शकता. यामध्ये कोणताही व्यक्ती गुंतवणूक करु शकतो. तुमच्या मुलांच्या नावावर देखील तुम्ही हे खातं उघडू शकाल. त्यामुळे 18 वर्षांखालील मुलांनाही याचा लाभ मिळू शकतो. त्याचप्रमाणे जॉइंट अकाउंट देखील उघडता येते. NRI त्याचप्रमाणे हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली (HUF) ना सुद्धा याचा योजनेचा लाभ मिळेल. 5 वर्षांनी ही योजना मॅच्युअर होते. यामध्ये दरवर्षी व्याज जोडलं जातं आणि कंपाउंड इंटरेस्टमुळे हा पैसा वाढत जातो.

(हे वाचा-खूशखबर!...तर भारतात पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त होणार, वाचा हे आहे कारण)

ही योजना सरकारी असल्यामुळे सुरक्षित आहे. यामध्ये टॅक्सवर मिळणारी सूट केवळ 1.5 लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवरच आहे. आयकर अधिनियम 80C अंतर्गत ही सूट मिळते. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुमचा टीडीएस कापला जात नाही.

सर्टिफिकेट खरेदी करण्याची प्रक्रिया

नॅशनल सेव्हिंग सर्टिफेकेट तुम्ही नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती आणि तुम्ही गुंतवणूक करणार आहात ती रक्कम भरावी लागेल. याबरोबर काही सपोर्टिंग कागदपत्र लागू शकतात. सर्टिफिकेट तुम्ही रोख रक्कम किंवा चेक देऊन खरेदी करु शकता. चेकने पैसे भरल्यास पेमेंट पूर्ण झाल्यानंतरच तुमचं खातं उघडण्यात येईल.

(हे वाचा- 1 एप्रिलपासून बदलणार PAN, आयकर, GSTचे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम)

हे सर्टिफिकेट तुम्ही एका पोस्टातून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करू शकता. त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर देखील हस्तांतरित करू शकता.

पैसे कधी काढू शकाल?

या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे. मात्र काही नियमांचं पालन करून तुम्ही तुमचे बचत केलेले पैसे एका वर्षात काढू शकता. त्यासाठी ठराविक रक्कम पेनल्टी म्हणून द्यावी लागेल. या योजनेतील व्याजदर 3 महिन्यांनी बदलतो किंवा निश्चित केला जातो. घटणाऱ्या व्याजदरानुसार गुंतवणुकीमध्ये बदल करणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Post office