खूशखबर! ...तर भारतात पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त होणार, वाचा हे आहे कारण

खूशखबर! ...तर भारतात पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त होणार, वाचा हे आहे कारण

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीमध्ये 10 टक्क्यांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लीटर 4 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 मार्च : शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीमध्ये 10 टक्क्यांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. OPEC देशांनी प्रोडक्शनमध्ये कपात न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या कारणामुळे भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लीटर 4 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. यावर्षी पेट्रोल आणि डिझेलची किंमत 4 रुपयांपेक्षा जास्त रुपयांनी कमी झाली आहे.

US WTI आणि ब्रेंट क्रुड (Brent Crude Oil) च्या दरातही घट झाली आहे. दोन्ही कच्च्या तेलांची किंमत क्रमश: 10.07 % आणि 9.4 टक्क्यांनी उतरली आहे. ओपेक आणि त्यांच्या सहकारी देशांच्या बैठकीमध्ये  क्रुड प्रोडक्शनमध्ये कपात करण्यावर निर्णय झाला नाही.

पेट्रोल-डिझेल 3-4 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्या तेलाच्या किंमतीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून आला. यावर्षी पेट्रोलचे दर 4 रुपयांनी तर डिझेलचे दर 4.15 रुपयांनी कमी झाले आहेत.

(हे वाचा-कोण आहेत वायव्ही सुब्बा रेड्डी, येस बँकेतून वाचवले बालाजी देवस्थानचे 1300 कोटी)

केडिया कमोडिटीजचे अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला तर देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किंमती 3 ते 4 रुपयांनी कमी होतील. मात्र रुपयाचं मुल्य कमी झाल्यास पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता धुसर आहे.

काय आहेत US WTI आणि ब्रेंट क्रुडचे भाव?

शुक्रवारी US West Texax Intermediate (WTI) क्रुडचे भाव 4.62 डॉलर म्हणजेच 10.07 टक्क्यांनी कमी झाले आहेत. यानंतर WTI चे दर प्रति बॅरल 41.28 डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. ऑगस्ट 2016 नंतरचा हा सर्वाधिक कमी भाव आहे. ब्रेंट क्रुडच्या दरात 9.4 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर ब्रेंट क्रुडचा भाव प्रति बॅरल 45.27 डॉलरपर्यंत उतरला आहे. जून 2017 नंतरचा हा सर्वाधिक कमी भाव आहे.

(हे वाचा-1 एप्रिलपासून बदलणार PAN, आयकर, GSTचे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम)

ओपेक आणि त्यांच्या सहकारी देशांच्या बैठकीमध्ये  क्रुड प्रोडक्शनमध्ये कपात करण्यावर निर्णय झाला नाही. त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे. मार्च अखेरपर्यंत कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये कपात करण्याचा निर्णय आधीच्या बैठकीत घेण्यात आला होता. सध्या त्याची अंमलबजावणी होत असली तरी मार्चनंतर हा निर्णय सुरूच राहील की नाही, हे सांगता येत नाही. रूसचे ऊर्जामंत्री अलेक्झांडर नोव्हाक यांनी सांगितल्याप्रमाणे 1 एप्रिलपर्यंत कोणताही OPEC सदस्य देश तेलाचं उत्पादन करणार नाही आहे.

कोरोनाच्या हाहाकारानंतर त्याचा परिणा कच्च्या तेलाच्या मागणीवरही झाला आहे. आंतरराष्ट्रीया बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वारंवार घसरण पाहायला मिळत आहे. याआधी 2008मध्ये ओपेक आणि त्यांच्या सहकारी देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये दर दिवशी 42 लाख बॅरलची कपात केली होती. हा काळ आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटाचा (Global Financial Crisis) होता. या निर्णयानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सुधारणा झाली होती.

First published: March 7, 2020, 5:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading