Home /News /money /

नोकरीऐवजी 2 लाख रुपयांमध्ये सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिन्याला मिळेल 5 लाखांचा भरघोस नफा, जाणून घ्या

नोकरीऐवजी 2 लाख रुपयांमध्ये सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिन्याला मिळेल 5 लाखांचा भरघोस नफा, जाणून घ्या

अमूलची फ्रँचायजी घेऊन तुम्हाला चांगला व्यवसाय करता येऊ शकतो. जाणून घ्या अधिक माहिती

    मुंबई, 28 जानेवारी : जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला अशा एका बिझनेस (business opportunity) बद्दल सांगणार आहोत, जो सुरू करून तुम्ही पहिल्या दिवसापासून भरघोस कमाई करू शकता. मग तुम्ही नोकरीचा विचार सोडून द्याल. डेअरी प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या अमूल कंपनी (Amul) सोबत बिझनेस करण्याची ही सध्याच्या काळातील सर्वात मोठी संधी आहे. अमूल नव्या वर्षातही फ्रँचायजी ऑफर करत आहे. कमी गुंतवणूकीमध्ये (Investment) दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळवता येऊ शकतं. अमूलची फ्रँचायजी (Amul Franchise) घेणं हे फायदेशीर आहे. कारण यामध्ये नुकसान होण्याची शक्यता नगण्य असते. 2 लाखांपासून सुरू करू शकता बिझनेस अमूल कोणत्याही रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगशिवाय फ्रँचायजी ऑफर करत आहे. एवढंच नाहीतर अमूलच्या फ्रँचायजी किंवा शाखेचा खर्चही खूप जास्त नाही. तुम्ही 2 लाखांपासून ते 6 लाखांपर्यंत खर्च करून आपला व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाच्या सुरूवातीलाच चांगला नफा मिळवता येऊ शकतो. फ्रँचायजीमार्फत दर महिन्याला जवळपास 5 ते 10 लाख रूपयांची विक्री होऊ शकते. पण हे तुमच्या फ्रँचायजीच्या जागेवरही अवलंबून आहे. वाचा : Multibagger Share : 'या' शेअरची किंमत सहा दिवसात 29 रुपयांवरुन 42 रुपये कशी घेता येईल फ्रँचायजी अमूलतर्फे दोन प्रकारच्या फ्रँचायजी ऑफर केल्या जात आहेत. पहिली अमूल आऊटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल किऑस्‍कची फ्रँचायजी आणि दुसरी अमूल आईस्क्रीम स्‍कूपिंग पार्लरची फ्रँचायजी आहे. जर तुम्ही पहिल्या प्रकारात गुंतवणूक करणार असाल तर 2 लाख रूपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही दुसऱ्या फ्रँचायजी बाबत विचार करत असाल तर 5 लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून 25 ते 30 हजार रूपये द्यावे लागतात. किती मिळतं कमिशन? अमूलचं आउटलेट (Amul Outlet) घेतल्यास कंपनी अमूल प्रॉडक्ट्सच्या मिनिमम सेलिंग प्राईस म्हणजेच एमआरपीवर (MRP) कमिशन देते. यामध्ये एका दूधाच्या पिशवीवर 2.5 टक्के, दूधाच्या प्रॉडक्ट्सवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के एवढं कमीशन मिळतं. अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायजी घेतल्यास रेसिपी बेस्ड आईस्क्रीम, मिल्कशेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंक्सवर 50 टक्के एवढं कमिशन मिळतं. तर प्री-पॅक्ड आईस्क्रीमवर 20 टक्के आणि अमूल प्रॉडक्ट्सवर कंपनी 10 टक्के कमिशन देते. वाचा : 10 लिटर Beer च्या निर्मितीसाठी किती किलो धान्यांचा केला जातो वापर?, वाचा सविस्तर एवढ्या जागेची असते आवश्यकता जर तुम्ही अमूल आऊटलेट घेतलं तर तुमच्याकडे 150 स्क्वेअर फूट जागा असायला हवी. तर अमूल आईस्क्रीम पार्लरच्या फ्रँचायजीसाठी कमीत कमी 300 स्क्वेअर फूट जागा असायला हवी. कशी करता येईल नोंदणी जर तुम्हाला फ्रँचायजीसाठी नोंदणी करायची असेल तर retail@amul.coop या ईमेल आयडीवर मेल करावा लागेल. याशिवाय या लिंकवर http://amul.com/m/amulscoopingparlours जाऊनही तुम्ही माहिती घेऊ शकता. अमूल आणि आईस्क्रीम हे समीकरण अनेक वर्ष घट्ट जुळलेलं आहे. जर व्यवसायाबाबत गंभीरतेने विचार करत असाल तर हा सुरक्षित पर्याय आजमावायला काहीच हरकत नाही.
    First published:

    Tags: Business, Money, Small business

    पुढील बातम्या