मराठी बातम्या /बातम्या /मनी /Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना, अवघे 1500 रुपये प्रति महिना गुंतवणूक करुन मिळवा 35 लाख

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना, अवघे 1500 रुपये प्रति महिना गुंतवणूक करुन मिळवा 35 लाख

Post Office Scheme: तुम्हीही गुंतवणुकीचा असा पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते

Post Office Scheme: तुम्हीही गुंतवणुकीचा असा पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते

Post Office Scheme: तुम्हीही गुंतवणुकीचा असा पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : सध्या बाजारात गुंतवणुकीचे (investment) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी अनेक योजनांवर (schemes) आकर्षक रिटर्न्स (attractive returns) मिळण्याचा दावा केला जात आहे. त्यांच्यापैकी काहींमध्ये जोखीम खूप जास्त आहे. अनेक गुंतवणूकदार फायदा (low profit) कमी असला, तरी सुरक्षित असलेल्या गुंतवणूक (safe investment) योजनांना प्राधान्य देतात. कारण त्यामध्ये धोका कमी असतो. काही गुंतवणूक योजनांमध्ये मात्र चांगले रिटर्न्स मिळण्याबरोबरच जोखीमही कमी असते. तुम्हीही गुंतवणुकीचा असा पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

    भारतीय पोस्ट (Indian Post) विभागाची ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana) हा असाच चांगला गुंतवणुकीचा पर्याय आहे. त्यामध्ये कमी जोखमीमध्ये चांगले रिटर्न्स मिळू शकतात. ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत, बोनससह विमा रक्कम वयाच्या 80 व्या वर्षी किंवा संबंधित ग्राहकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कायदेशीर वारसाला किंवा त्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला मिळते.

    वाचा : या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 140 टक्क्यांचा रिटर्न! तुमच्याकडे आहे का हा शेअर?

    योजनेच्या नियम व अटी

    19 ते 55 वयोगटातला कोणताही भारतीय नागरिक ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत किमान 10,000 ते 10 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक अशा मुदतीने भरता येतो. ग्राहकाला प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधीदेखील दिला जातो. पॉलिसी सुरू असताना काही कारणाने हप्ते थकवले गेल्यास, ग्राहक थकीत प्रीमियम भरून पॉलिसीचं पुनरुज्जीवनही करू शकतो.

    तीन वर्षांनंतर सरेंडर करता येते पॉलिसी

    ग्राहक 3 वर्षांनंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो; मात्र अशा परिस्थितीत त्याला योजनेचा अन्य कोणताही लाभ मिळत नाही. पॉलिसीचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय पोस्ट विभागाने देऊ केलेला बोनस. प्रति 1000 रुपयांना 65 रुपये प्रति वर्ष बोनस या योजनेंतर्गत देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत कर्ज सुविधेचासुद्धा लाभ घेता येतो; मात्र हा लाभ पॉलिसी खरेदी केल्यानंतर 4 वर्षांनी मिळू शकतो. म्हणजेच पॉलिसीधारक 4 वर्षांनंतर त्यावर कर्ज घेऊ शकतो.

    वाचा : ATM आणि बँकिंग सर्व्हिसमध्ये समस्या आल्यास इथे करा तक्रार

    पॉलिसी मॅच्युरिटीनंतर मिळणारे फायदे

    एखाद्याने 19 वर्षं वय असताना 10 लाखांची ग्राम सुरक्षा पॉलिसी घेतली, तर 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल. 60 वर्षांसाठी मॅच्युरिटी लाभ 34.60 लाख रुपये मिळेल.

    येथे मिळेल माहिती

    या योजनेची माहिती मिळवण्यासाठी, तसंच योजना घेतल्यानंतर नॉमिनी नाव किंवा ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर यांसारखे तपशील अपडेट करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी ग्राहक 1800 180 5232/155232 या टोल फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात किंवा www.postallifeinsurance.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून माहिती घेऊ शकतात.

    First published:
    top videos

      Tags: Investment, Money, Post office saving