मुंबई, 25 ऑगस्ट : देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून (second wave of corona virus) अर्थव्यवस्था (economy) सावरत असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी काही महत्त्वाच्या घोषणा (announcements) केल्या आहेत. सरकारी बँकेत काम करत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचं निधन झालं, तर त्याच्या कुटुंबीयांना 30 टक्के अधिक पेन्शन मिळणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. यापूर्वी जेवढी पेन्शन हातात मिळत होती, त्यापेक्षा 30 टक्के अधिक रकक्म त्यात जमा केली जाईल, असं त्या म्हणाल्या.
सार्वजनिक बँकांतील अधिकाऱ्यांशी चर्चा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच मुंबईत आलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातील प्रमुख सार्वजनिक बँकांच्या मुख्य अधिकाऱ्यांची आणि प्रमुखांची बैठक घेतली. गेल्या वर्षभरात विविध बँकांनी केलेल्या कामगिरीचा त्यात आढावा घेण्यात आला. कोरोना काळात झालेल्या आर्थिक नुकसानातून सावरण्यासाठी काय पावलं उचलावी लागतील, याचा धांडोळादेखील या बैठकीत घेण्यात आला.
#BreakingNews। वित्त मंत्री की प्रेस कॉन्फ्रेंस ▶️PSU बैंकों की सालाना रिपोर्ट पर चर्चा हुई है ▶️CBDT के साथ कई मुद्दों पर चर्चा हुई ▶️दूसरी लहर के बाद शुरू हुए स्कीम पर चर्चा ▶️आत्मनिर्भर भारत के अमल पर चर्चा हुई ▶️सभी बैंकों ने विस्तार से अपनी रिपोर्ट रखी pic.twitter.com/HJaTN9qXzn
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) August 25, 2021
धोरणात आणणार स्पष्टता
अर्थमंत्री सीतारमण यांनी मंगळवारी कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. यामध्ये मोदी सरकार बँकांबाबतची आर्थिक रणनिती अधिक सुस्पष्ट कऱण्यासाठी धोरण आखत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सर्वच सार्वजनिक बँकांनी अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी केल्याचं त्यांनी सांगितलं.
अर्थमंत्र्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
हे वाचा - तालिबानच्या कुरापती सुरुच, अफगाण नागरिकांसाठी काबूल विमानतळाचे दरवाजे बंद
बँक कर्मचाऱ्यांचा पेन्शन-पे आऊटही वाढणार
बँक कर्मचाऱ्यांच्या पेन्शन पे-आऊट योजनेची सीमा 9284 रुपयांवरून वाढवून ती 30 हजार ते 35 हजार रुपये केली जाणार असल्याचा विचार सुरू असल्याची माहिती वित्त विभागाचे सचिव तरुण बजाज यांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सरकारी बँकांचा पूर्वी असणारा 10 टक्के वाटा वाढवून आता तो 14 टक्के करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank, Nirmala Sitharaman