Home /News /money /

महागाईचा उच्चांक : म्युच्युअल फंडांचं गुंतवणूक धोरण ठरवण्यासाठी चांगली संधी?

महागाईचा उच्चांक : म्युच्युअल फंडांचं गुंतवणूक धोरण ठरवण्यासाठी चांगली संधी?

म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूकदारांनी फक्त आर्थिक उत्पन्नाचा एक स्रोत म्हणून न बघता त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक ध्येयाच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. एका शिस्तबद्ध आणि पद्धतशीर दृष्टिकोनामुळे, तसंच पोर्टफोलिओच्या वार्षिक आढाव्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होतं.

पुढे वाचा ...
    >> आदिल शेट्टी, सीईओ, बँकबाझार डॉट कॉम गेल्या अनेक दशकांमधला उच्चांक होण्याच्या दिशेने महागाईची सध्या वाटचाल सुरू असलेली दिसत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून व्याजदरातही वाढ होत आहे. महागाई (Inflation) आणि व्याजदरांमुळे (Interest Rates) भारतीय स्टॉक मार्केट (Indian Stock Market) सध्या अस्थिरतेतून जात आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Investment In Mutual Fund) केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पोर्टफोलिओ कमी होताना दिसत आहेत. विशेषत: इक्विटी ओरिएंटेड स्कीम्सच्या (Equity Oriented Schemes) बाबतीत हे जास्त जाणवत आहे. अर्थात दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना कारण नसताना काळजी करण्याची किंवा अस्वस्थ होण्याची गरज नाही. सध्याच्या परिस्थितीत अशा गुंतवणूक धोरणाची गरज आहे, जी त्यांच्या पोर्टफोलिओची नीट काळजी घेऊ शकेल आणि दीर्घकालीन आर्थिक उत्पन्न देऊ शकेल. म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूकदारांनी फक्त आर्थिक उत्पन्नाचा एक स्रोत म्हणून न बघता त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक ध्येयाच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. एका शिस्तबद्ध आणि पद्धतशीर दृष्टिकोनामुळे, तसंच पोर्टफोलिओच्या वार्षिक आढाव्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होतं. गुंतवणुकीच्या काळात, पर्याप्त मार्केट स्थितीनुसार कमी काळासाठी किंवा मध्यम काळासाठीच्या आर्थिक धोरणांचाही विचार करू शकतो. अर्थात त्यासाठी गुंतवणूकीच्या मूलभूत गोष्टींना धक्का लागू नये याची खात्री हवी. सध्याचा महागाईचा उच्चांक आणि हीच स्थिती मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता पाहता ही तुमच्यासाठी तुमच्या म्युच्युअल फंडांचं गुंतवणूक धोरण ठरविण्यासाठी चांगली संधी असू शकते. सध्याच्या परिस्थितीचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. इक्विटी स्कीम्समध्ये अतिरिक्त खरेदी (Additional Purchase In Equity Schemes) इक्विटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी SIP मध्ये किंवा एकरकमी गुंतवणूक करत राहावी. स्टॉक मार्केट ऐतिहासिक अशा उच्चांकानंतर आता जवळपास 20% खाली आलेलं आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्या खर्चाची सरासरी काढण्यासाठी (NAV) म्हणजेच नेट अ‍ॅसेट व्हॅल्यूवर युनिट्स खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. त्यामुळे, सध्याच्या अस्थिरतेचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊन निधीच्या उपलब्धतेनुसार तुम्हीही त्यात उतरू शकता. सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन अर्थात STP चा अवलंब करण्याचाही तुम्ही विचार करू शकता. त्याद्वारे लिक्विड स्कीममधली लम्पसम गुंतवणूक इक्विटी स्कीममध्ये सिस्टिमॅटिकल पाठवली जात राहते. अल्प आणि मध्यम मुदतीच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक (Invest in Short and Medium-Term Debt Fund) सध्या कर्जरोख्यांमध्ये (Debt Fund) गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार आणि ज्यांना या त्यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी व्याजदरातल्या अस्थिरतेचा कमीत कमी परिणाम होणाऱ्या अल्पकालीन कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा. व्याजदरात होणाऱ्या वाढीचा कर्जाच्या साधनांच्या मूल्यांशी उलटा संबंध असतो हे गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. याचा सरळ अर्थ म्हणजे जास्त व्याजदराच्या चक्रामध्ये हे डेट फंड म्हणजे कर्जरोखे फारसे चांगले ठरत नाहीत. त्याच वेळी तुम्ही क्रेडिट रिस्क डेट फंड घेणंही शक्यतो टाळलं पाहिजे. SGB आणि Gold ETFs मध्ये गुंतवणूक महागाईविरुद्ध सोन्याला एक अडथळा मानलं जातं. गुंतवणूकदार सोन्याशी संबंधित विविध फंड्सचा विचार करू शकतात - gold ETFs किंवा Sovereign Gold Bonds (SGBs) ही त्याचीच उदाहरणं आहेत. खरं पाहता, सोन्यामधल्या गुंतवणुकीचा वाटा हा तुमच्या एकूण पोर्टफोलिओपैकी 5-10% पेक्षा जास्त नसावा. तुमची सोन्यामधली गुंतवणूक 5% पेक्षा कमी असेल तर तुम्ही आणखी गोल्ड फंड घेण्याचा विचार करू शकता. नवीन गुंतवणूकदारांनी सुरुवात करण्यासाठी सोन्याशी संबधित किमान 5% फंड्स घेण्याचा विचार करावा. डायनॅमिक अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड्समध्ये गुंतवणूक (Invest in Dynamic Asset Allocation Funds) मालमत्तेचं योग्य पद्धतीनं वाटप म्हणजेच अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन हा यशस्वी गुंतवणुकीसाठीचा एक यशस्वी मार्ग असतो. विविध प्रकारच्या मालमत्तेच्या किमतीवर आधारित अशा विविध प्रकारच्या स्कीम्सचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. विशेषत: ज्या अ‍ॅसेटमध्ये debt आणि इक्विटी अशी दोन्ही वैशिष्ट्यं अंतर्भूत असतील अशा अ‍ॅसेट्सचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. प्युअर इक्विटी किंवा debt स्कीम्सच्या तुलनेत अशा फंडांमधले रिटर्न्स जास्त स्थिर असतात. SIP मधलं योगदान वाढवा जसं पोर्टफोलिओचा वार्षिक आढावा घेणं महत्त्वाचं आहे, तसंच SIP च्या गुंतवणुकीचा आढावा घेणंही महत्त्वाचं आहे. सध्याच्या महागाईमध्ये गुंतवणूकदारांनी दर वर्षी SIP मधली रक्कम 10% टक्क्यांनी वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या भविष्यकालीन आर्थिक उद्दिष्टांचीही आपोआप काळजी घेतली जाईल आणि गुंतवणुकीच्या काळात चलनवाढीमुळे निर्माण होणारा ताण कमी होण्यासही यामुळे मदत होईल. कोणत्याही परिस्थितीत अस्वस्थ होऊ नका तुम्हाला जेव्हा अगदी खरीच आर्थिक गरज असेल तोपर्यंत तुमची इक्विटी गुंतवणूक मागे घेऊ नका. मार्केटमध्ये घसरण होणं हे पैसे काढून घेण्याचं कारण असू नये. खरं तर अशी अस्थिर किंवा अस्वस्थ करणारी परिस्थिती ही गुंतवणूक कायम ठेवण्यासाठी किंवा त्यात जास्त रक्कम जोडण्यासाठी अत्यंत योग्य परिस्थिती असते. सध्याची परिस्थिती ही तुमची संपत्ती वाढवण्यासाठी योग्य संधी म्हणून वापरा; पण जर तुम्ही अशा परिस्थितीत तुमची गुंतवणूक काढून घेतली तर त्यामुळे तुम्हाला अधिक संपत्ती निर्माण करता येणार नाहीच आणि तुमचा हा गुंतवणुकीबाबतच्या अत्यंत वाईट अनुभवामुळे तुम्हाला भविष्यात गुंतवणूक करण्यापासून रोखलं जाईल. अर्थातच यामुळे तुमचं दीर्घकालीन आर्थिक नुकसान होऊ शकतं. घसरण झालेल्या सेक्टोरल फंड्समध्ये गुंतवणूक (Beaten Down Sectoral Funds) अशा परिस्थितीत, सेक्टर ओरिएंटेड फंड म्हणजेच कोअर डाव्हर्सिफाइड इक्विटी सॅटेलाइट फंड्सकडेही लक्ष दिलं पाहिजे. गेल्या काही महिन्यांत, बँकिंग, औषधं, आयटी अशा काही सेक्टर्समध्ये कमालीची घसरण झालेली दिसून येते. अशा योजनांमध्ये एकरकमी गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदार विचार करू शकतात. त्यामुळे दीर्घ काळात तुमच्या एकूणच गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओची किंमत वाढू शकते. वर सांगितलेल्या सर्व गोष्टी सर्व प्रकारच्या गुंतवणुकीदारांसाठी अर्थातच योग्य ठरू शकत नाहीत. कोणतंही धोरण स्वीकारण्याआधी तुम्ही जोखमीचा, तुमचं वय आणि उद्दिष्टाचा विचार केला पाहिजे. अधिक योग्य माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊ शकतात.
    First published:

    Tags: Money, Mutual Funds, Savings and investments

    पुढील बातम्या