मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Saving in Post Office | पोस्ट ऑफिसमध्ये बचत करण्याचा विचार करताय? तर मग आधी हे वाचा, फायदा होईल

Saving in Post Office | पोस्ट ऑफिसमध्ये बचत करण्याचा विचार करताय? तर मग आधी हे वाचा, फायदा होईल

Saving in Post Office : सध्याच्या परिस्थितीमुळे अनेकजण बचत (Saving) करण्याला प्राधान्य देताना दिसत आहे. मात्र, बाजारात बचतीचे अनेक मार्ग असल्याने गोंधळ होण्याचीही शक्यता आहे. परिणामी बचत करण्यासाठी योग्य मार्ग कोणता असा प्रश्ना अनेकांच्यासमोर उपस्थित होतो. आम्ही तुम्हाला अशाच एका सुरक्षित योजनेबद्दल सांगणार आहोत.

Saving in Post Office : सध्याच्या परिस्थितीमुळे अनेकजण बचत (Saving) करण्याला प्राधान्य देताना दिसत आहे. मात्र, बाजारात बचतीचे अनेक मार्ग असल्याने गोंधळ होण्याचीही शक्यता आहे. परिणामी बचत करण्यासाठी योग्य मार्ग कोणता असा प्रश्ना अनेकांच्यासमोर उपस्थित होतो. आम्ही तुम्हाला अशाच एका सुरक्षित योजनेबद्दल सांगणार आहोत.

Saving in Post Office : सध्याच्या परिस्थितीमुळे अनेकजण बचत (Saving) करण्याला प्राधान्य देताना दिसत आहे. मात्र, बाजारात बचतीचे अनेक मार्ग असल्याने गोंधळ होण्याचीही शक्यता आहे. परिणामी बचत करण्यासाठी योग्य मार्ग कोणता असा प्रश्ना अनेकांच्यासमोर उपस्थित होतो. आम्ही तुम्हाला अशाच एका सुरक्षित योजनेबद्दल सांगणार आहोत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 30 नोव्हेंबर : अलीकडच्या काळातील एकूणच आर्थिक अनिश्चिततेमुळे बचत (Saving) करणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातल्या कोणत्याही संभाव्य बऱ्या-वाईट गोष्टींकरिता आर्थिक तरतूद असावी, या दृष्टिकोनातून बचतीचा मार्ग स्वीकारला जात आहे. खरं तर आर्थिक नियोजनासाठी बचत ही एक उत्तम संधी असते. आज खासगी, सहकारी आणि सरकारी बँका, वित्तीय संस्था बचतीच्या अनेक योजना राबवताना दिसतात. म्युच्युअल फंडासारखे (Mutual Fund) पर्यायदेखील बचत आणि गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत; मात्र, प्रत्येकजण सुरक्षित बचतीला प्राधान्य देतो. अशाच एका सुरक्षित बचत योजनेबद्दल आपण जाणून घेऊया.

अगदी नाममात्र बचत करायची असली, तरी काहीजण बाजारातल्या बचत योजनांचा अभ्यास करतात, तज्ज्ञांचा सल्ला घेतात, गरज आणि परतावा यांचा मेळ बसतो की नाही याची पडताळणी करतात. अर्थात ही बाब योग्यच आहे. आज रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) आणि फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) हे बचतीचे उत्तम पर्याय मानले जातात. अनेक बँका, वित्तीय संस्थांमध्ये या अनुषंगानं सुविधा उपलब्ध असते. परंतु, रिकरिंग डिपॉझिट किंवा `आरडी`साठी (RD) याव्यतिरिक्त अजून एक सुरक्षित पर्याय मानला जातो तो म्हणजे पोस्ट ऑफिस (Post Office).

RD Interest rate : रिकरिंग डिपॉझिटवरील व्याज दर मोजण्यासाठी वापरा `हे` सूत्र

महत्त्वाचा शासकीय विभाग असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही बचतीकरिता आरडी अकाउंट (RD Account) सुरू करू शकता. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ग्राहकांना विविध बचत आणि विमा सेवा पुरवल्या जातात. त्यात आरडी ही विशेष लोकप्रिय अशी योजना आहे. अर्थात या लोकप्रियतेमागे आकर्षक व्याज दर (Interest Rate) हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. `आरडी`साठी पोस्ट ऑफिस नेमका किती व्याज दर देतं, याविषयी माहिती जाणून घेऊ या.

पोस्टात खातं कसं उघडायचं?

कोणत्याही स्वरूपात बचत करताना सर्वप्रथम पाहिला जातो, तो मिळणारा व्याजदर. कारण या व्याजदरावरच बचतीतून मिळणारं उत्पन्न (Income) अवलंबून असतं. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी अकाउंटमध्ये बचत सुरू केल्यास तुम्हाला आकर्षक व्याज दर मिळू शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला किमान 5 वर्षं कालावधीसाठी आरडी अकाउंटमध्ये बचत करता येते. अगदी 100 रुपये डिपॉझिट करून तुम्ही बचतीला प्रारंभ करू शकता. तसंच यात रक्कम डिपॉझिट करण्याकरिता कोणतीही कमाल मर्यादा नसते. 10 रुपयांच्या पटीत तुम्ही कितीही रक्कम डिपॉझिट अकाउंटमध्ये भरू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही पोस्ट ऑफिसमधल्या आरडी अकाउंटमध्ये 6 महिन्यांकरिता बचतीची निश्चित रक्कम आगाऊ भरणार असाल तर त्यावरही विशेष सूट दिली जाते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं आरडी अकाउंट एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफरदेखील करू शकता. बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही वैयक्तिक किंवा जॉइंट आरडी अकाउंट बचतीकरिता सुरू करू शकता. कोणत्याही महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुम्ही हे अकाउंट सुरू केलं असेल तर तुम्हाला बचतीची रक्कम त्यापूर्वी जमा करणं अनिवार्य असतं. तसंच तुम्ही हे अकाउंट कोणत्याही महिन्याच्या 15 तारखेनंतर सुरू केलं तर त्या तारखेपासून महिना अखेरपर्यंत तुम्ही यात बचतीची निश्चित रक्कम जमा करू शकता. काही कारणामुळे तुम्हाला एखाद्या विशिष्ट कालावधीत किंवा एखाद्या महिन्यात बचतीची रक्कम अकाउंटमध्ये भरता आली नाही तर पोस्ट ऑफिस प्रत्येक 100 रुपयांवर 1 रुपया दंड आकारतं.

आकर्षक व्याजदर हे पोस्टातल्या `आरडी`चं वैशिष्ट्य म्हणता येईल. पोस्ट ऑफिसच्या व्याजदरात नियमानुसार सातत्यानं सुधारणा होत असते. परंतु, 1 एप्रिल 2020 च्या नियमानुसार सध्या पोस्ट ऑफिस आरडी बचतीवर प्रति वर्षी 5.8 टक्के व्याज दर देत आहे. हे व्याज प्रत्येक तिमाहीत चक्रवाढ रीतीने आकारलं जातं. अकाउंट सुरू केल्याच्या तारखेला 5 वर्षांनंतर अकाउंट मॅच्युअर (Mature) होतं. तुम्हाला 5 वर्षांनंतरही या अकाउंटच्या माध्यमातून बचत सुरू ठेवायची असेल तर संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये याकरिता अर्ज करता येतो; मात्र आरडी अकाउंट सुरू करतेवेळी जो व्याज दर असतो, तोच पुढेही कायम राहतो.

PF Account : आधार आणि UAN लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस, कसं कराल?

कोणत्याही स्वरूपात बचत करताना काही अडचणी निर्माण झाल्या आणि बचत खातं मुदतीपूर्वी बंद करावं लागलं तर त्याचा निश्चितच तोटा खातेधारकाला सहन करावा लागतो. काही कारणांमुळे तुम्हाला पोस्टातलं आरडी अकाउंट बंद करायचं असेल तर विहित अर्ज सादर करून अकाउंट सुरू केल्याच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर आरडी अकाउंट मुदतीपूर्व बंद करता येतं. तुम्ही काही महिन्यांची बचतीची रक्कम आगाऊ (Advance) आरडी अकाउंटमध्ये जमा केली असेल तर मुदतीपूर्वी हे अकाउंट बंद करता येत नाही.

एकूणच तुलनात्मक विचार करता कोणत्याही बँकेतल्या आरडी अकाउंटच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमधल्या आरडी अकाउंटवर दिला जाणारा व्याजदर अधिक असतो. यामुळे बचतीच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न तुलनेनं अधिक असतं. याशिवाय हा बचतीचा सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय मानला जातो. त्यामुळे तुम्ही व्याजदर अधिक मिळवू इच्छित असाल तर पोस्टातली बचत निश्चितच लाभदायी ठरू शकते.

First published:

Tags: Post office, Post office recurring deposit, Post office saving