मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Post Office Investment: पोस्टाने दिली पैसा कमावण्याची संधी, या योजनेत पाच वर्षांत 15 लाखांचे होतील 21 लाख

Post Office Investment: पोस्टाने दिली पैसा कमावण्याची संधी, या योजनेत पाच वर्षांत 15 लाखांचे होतील 21 लाख

पाच वर्षांत 15 चे 21 कसे होतील ते समजून घ्या. या पोस्टाच्या योजनेत वार्षिक चक्रवाढ व्याज पद्धतीनं हे व्याज दिलं जातं.

पाच वर्षांत 15 चे 21 कसे होतील ते समजून घ्या. या पोस्टाच्या योजनेत वार्षिक चक्रवाढ व्याज पद्धतीनं हे व्याज दिलं जातं.

पाच वर्षांत 15 चे 21 कसे होतील ते समजून घ्या. या पोस्टाच्या योजनेत वार्षिक चक्रवाढ व्याज पद्धतीनं हे व्याज दिलं जातं.

नवी दिल्ली, 31 मे :  पोस्ट खात्याच्या  अल्पबचत योजना या उत्तम परतावा देणाऱ्या आणि सुरक्षित योजना मानल्या जातात. मोठ्या संख्येनं लोक या योजनांमध्ये गुंतवणूक करून जोखीमरहित परताव्याचा लाभ घेतात. तुम्हालाही सुरक्षित आणि उत्तम परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट खात्याच्या अल्पबचत योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. बँकेतली मुदतठेवकिंवा रिकरिंग ठेव योजनेपेक्षा यातून चांगला परतावा मिळतो. तसंच यात गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात. पोस्टाच्या उत्तम गुंतवणूक योजनांपैकी एक आहे नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट-एनएससी अर्थात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. व्याजदर :  एनएससी योजनेतल्या गुंतवणुकीवर वार्षिक 6.8 टक्के दरानं व्याज दिलं जातं. वार्षिक चक्रवाढ व्याज पद्धतीनं हे व्याज दिलं जातं; मात्र हे व्याज मुदतपूर्तीनंतरच मुद्दलासह दिलं जातं. ही योजना पाच वर्षं मुदतीची असून मुदत संपल्यानंतर ती आणखी 5  वर्षं वाढवता येऊ शकते. 1 जूनपासून होणार हे 6 मोठे बदल, तुमच्यावर होणार असा परिणाम गुंतवणुकीचे 5 पर्याय : नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट म्हणजेच एनएससीमध्ये 100, 500, 1000, 5000 आणि 10 हजार रुपयांची बचत प्रमाणपत्रं उपलब्ध आहेत. यापैकी कोणत्याही मूल्यांची कितीही बचत प्रमाणपत्रं घेता येतात. किमान गुंतवणूक 100 रुपये असून, कमाल गुंतवणूक मर्यादा काहीही नाही. तुम्ही कितीही गुंतवणूक यात करू शकता. 15 लाखांचे होतील 21 लाख :  तुम्ही या योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ते 5 वर्षांत 6.8 टक्के व्याजदरानं 20.85 लाख रुपये होतील. म्हणजे तुम्हाला तुमच्या 15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 6 लाख रुपये व्याज मिळेल. यावर प्राप्तिकर (Income tax) अधिनियम 1961च्या कलम 80 सीनुसार वर्षाकाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या करकपातीचा लाभदेखील मिळतो.

दररोज 160 रुपयांच्या बचतीवर मिळतील 23 लाख रुपये, टॅक्स सूटपासून मिळतील अनेक फायदे

कोणतीही जोखीम न घेता दीर्घकाळासाठी बँकांपेक्षा चांगला व्याजदर देणाऱ्या आणि पैसे बुडण्याची भीती नसलेल्या या योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान आहेत. निवृत्तीनंतर आपला पैसा सुरक्षित ठेवून त्याच्या व्याजाच्या उत्पन्नावर गुजराण करणारे कोट्यवधी नागरिक पोस्टाच्या या योजनांचे गुंतवणूकदार आहेत. देशातली प्रचंड मोठी संख्या असलेला सर्वसामान्य गुंतवणूकदार वर्ग  पोस्टाच्या योजनांनाच अधिक प्राधान्य देतो.
First published:

Tags: Investment, Post office, Post office money

पुढील बातम्या